शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

गावठाण फीडरवर कृषिपंपांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST

एक मूल एक झाड योजनेंतर्गत रोपांचे वाटप बुलडाणा : विवेकानंद गुरुकुंज प्राथमिक शाळेत एक मूल एक झाड योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना ...

एक मूल एक झाड योजनेंतर्गत रोपांचे वाटप

बुलडाणा : विवेकानंद गुरुकुंज प्राथमिक शाळेत एक मूल एक झाड योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक गजानन इंगळे यांच्या हस्ते विविध रोपांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात मुख्याध्यापक गजानन इंगळे यांनी पर्यावरण रक्षणात वृक्षांचे महत्त्व हे मोलाचे असल्याचे सांगितले. लहान वयात पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळले तर पर्यावरण रक्षणात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग राहु शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अडीच हजार रुपयांनी गडगडले सोयाबीनचे भाव

मेहकर : मोठा गाजावाजा करत बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला विक्रमी अकरा हजार रुपये भाव मिळत असल्याची नोंद प्रथमच घेण्यात आली. मात्र नवीन सोयाबीनची आवक येत्या काळात वाढण्याची शक्यता लक्षात घेता व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे भाव पुन्हा पाडल्याचा अंदाज शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्यातच शासनाने अजून हमीभाव जाहीर केलेले नाहीत. अवघ्या काही दिवसांतच पडलेले हे भाव शेतकऱ्यांनी लावलेल्या पेरणी व सोंगणीच्या खर्चालाही पुरेनाशी आहे.

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा उत्साहात

बुलडाणा : जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा गुरुवार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित केली होती. या सभेत पुराव्यानिशी प्रकरणे समितीसमोर दाखल करण्यात आली.

आरास ले आउटमधील नालीचे बांधकाम रखडले

बुलडाणा : शहरातील आरास ले आउटमधील नालीचे बांधकाम रखडल्यामुळे या नालीतील घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या नालीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. परंतु अद्यापही या मागणीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे.