शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन बाजारात

By admin | Updated: December 19, 2014 01:09 IST

पशुपालक संकटात : संभाव्य चारा व पाणीटंचाईची धास्ती.

नाना हिवराळे / खामगाव (बुलडाणा) यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील काळात चारा व पाणीटंचाईच्या धास्तीने शेतकर्‍यांनी पशुधन बाजारात विक्रीस काढले आहे. खामगावच्या गुरांच्या आठवडी बाजारात मोठय़ा प्रमाणात जनावरे विक्रीस आली; मात्र जनावरांच्या किमती घसरल्याने पशुपालक संकटात सापडले आहेत.खामगाव येथील गुरुवारच्या बाजारात आठवड्यागणीक जनावरांची विक्रीसाठी गर्दी वाढतच आहे. दुष्काळ व सद्य:स्थितीत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न पशुपालकांपुढे उभा ठाकला आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता गुराढोरांच्या चारा व पाण्याची समस्या बिकट होणार असल्याने जनावरे विक्रीस काढली आहेत. खामगावच्या बाजारात बैलजोडीचे भाव अक्षरश: अध्र्यावर आले आहेत. एक लाख किंमत असणार्‍या बैलजोडीस ६0 हजारांपेक्षा जास्त मागणी आलीच नाही. ५0 ते ६0 हजार किंमत असणारी व ३0 ते ४0 हजारापर्यंत बैलजोडीची किंमत पाहून पशुपालक डोक्याला हात लावून बसले होते. ४0 हजार किंमत असणारी बैलजोडीला २0 ते २५ हजारांपेक्षा जास्त भाव मिळत नसल्याचे बाजारात दिसून आले. शेतकरी फक्त बैल विक्रीसाठीच आणत असल्याचे चित्र आहे. खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसाच नसल्याने व्यापारीच खरेदी करीत आहेत. चारा व पाणीटंचाईच्या भीतीपोटी विक्रीस काढलेले पशुधन मातीमोल भावात विकण्याची परिस्थिती शेतकर्‍यांवर ओढवली आहे. *जनावरांचे भाव घसरलेखामगावच्या बाजारात गुरुवारी जनावरांची विक्रीकरिता आवक वाढली. म्हैस १0८, बकरी २९७, तर बैल १४६ विक्रीस आणले होते. बैलांची संख्या वाढली असली तरी भाव मात्र एकदमच घसरले होते. कमीत कमी १0 हजार ते महत्तम ४0 हजार रुपये जोडीचा भाव दिसून आला. दुष्काळाच्या गडद छायेत वृषभराजाला मातीमोल भावात विकावे लागत असल्याची परिस्थिती शेतकर्‍यांसमोर आली आहे.