शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाची समिती घेणार विविध याेजनांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST

बुलडाणा : महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती २८ व २९ सप्टेंबर राेजी जिल्ह्याच्या दाैऱ्यावर येणार आहे़ ही ...

बुलडाणा : महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती २८ व २९ सप्टेंबर राेजी जिल्ह्याच्या दाैऱ्यावर येणार आहे़ ही समिती विविध शासकीय, निमशासकीय विभाग व कार्यालयांतील अनुसूचित जाती समितीच्या कल्याणकारी योजना आणि बिंदुनामावली आदींची झाडाझडती घेणार असल्याने प्रशासन तयारीला लागले आहे़ याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत नियाेजन करण्यात आले आहे़

आमदार प्रणिती शिंदे या समितीच्या प्रमुख आहे़ याशिवाय समितीत विधानसभा व परिषदेचे विविध पक्षीय आमदार बालाजी किणीकर, संतोष बांगर, यशवंत माने, किरण लहामटे, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाने, टेकचंद सावरकर, नरेंद्र भोंडेकर, अरुण लाड, राजेश राठोड, विजय गिरकर, बाळाराम पाटील, राजू आवळे यांचा समावेश आहे़ याशिवाय त्यांच्यासमवेत अधिकारी, कर्मचारी, स्वीय सहायक, प्रतिवेदक आदींचा ताफा राहणार आहे़ या १६ सदस्यांसाठी १६ संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यामध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे़ त्यांना समितीचे आगमन ते प्रस्थानापर्यंत समितीसमवेत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय गंभीर कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे़ विधिमंडळ समितीचा दौरा निश्चित होताच जिल्हाधिकारी एस़ रामामूर्ती यांनी तात्काळ सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली़ त्यात समितीच्या अनुषंगाने जय्यत पूर्वतयारी करण्याचे आदेश देण्यात आले.

कल्याणकारी याेजनांचा घेणार आढावा

विधिमंडळ समिती २८ सप्टेंबर राेजी सकाळी ९ ते ९.३० दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील खासदार, आमदार, जि. प़ अध्यक्ष व सभापती यांच्या समवेत अनुसूचित जातीच्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेणार आहे़ तसेच त्यामध्ये आढळून येणाऱ्या त्रुटींवर चर्चा करणार आहे़ यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात क्रमशः १३ पालिका व नगरपंचायत, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वन, पाटबंधारे, अन्न नागरी पुरवठा, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम, शिक्षणाधिकारी, उत्पादन शुल्क, एसटी महामंडळ, समाज कल्याण, विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे़

अधिकारी, कर्मचारी भरतीवरही हाेणार चर्चा

ही समिती एससी प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी तथा कल्याणकारी योजनांवर ही चर्चा करणार आहे़ त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान शासकीय व अनुदानित शाळा, वसतिगृहे, जि.प.नगर परिषदांकडून करण्यात आलेल्या योजनांच्या कामांना व बुलडाणा पालिकेच्या दलित वस्ती योजनेच्या कामांची समिती पाहणी करणार आहे़

प्रशासन अलर्ट माेडवर

विधिमंडळ समितीचा दाैरा निश्चित हाेताच जिल्हा प्रशासन अलर्ट माेडवर आले आहे़ या समितीत अध्यक्षांपासून सदस्यांपर्यंत सर्व आमदार असल्याने प्रशासनाने दाैऱ्याची तयारी सुरू केली आहे़ सर्व विभागप्रमुखांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन नियाेजन करण्याचे आदेश दिले आहेत़