अनिल गवई/ खामगाव
जगाची वेगाशी स्पर्धा सुरू आहे. वाहतुकीच्या साधनांमध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. ग्रामीण भागात मात्र अजूनही सर्वसामान्य जनतेसाठी, ह्यएसटीह्ण या नावाने ओळखल्या जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस हेच प्रवासाचे साधन आहे. महाराष्ट्रातील किमान तीन पिढ्यांच्या अनेक सुखदु:खाच्या क्षणांची साक्षीदार असलेली लेकुरवाळी ह्यएसटीह्ण रविवारी बरोबर ६६ वर्षांची होणार आहे. या कालखंडात ह्यएसटीह्णने अनेक चढउतार अनुभवले असले तरी, प्रवाशांच्या सेवेचे असिधारा वत अविरत सुरूच ठेवले आहे. ह्यप्रवाशांच्या सेवेसाठीह्ण हे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी)ची स्थापना १ जून १९४८ झाली. त्याच दिवशी पहिली ह्यएसटीह्ण बस रस्त्यावर धावली होती. स्थापनेच्या वेळी महामंडळाकडे बेडफोर्ड कंपनीच्या ३६ गाड्या होत्या. त्या राज्यातील केवळ १५0 मार्गांवर धावत होत्या; मात्र अल्पावधीतच गाड्यांच्या ताफ्यात प्रचंड वाढ झाली. सध्या ह्यएसटीह्णच्या ताफ्यात २0 हजारापेक्षा जास्त बसगाड्या आहेत. या बसगाड्यांच्या माध्यमातून ७५ लाखापेक्षा अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. सणासुदीच्या, लग्नसराईच्या दिवसात त्यामध्ये आणखी वाढ होते. महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी ५२६ बसस्थानके असुन राज्याच्या सांस्कृतिक विकासात एसटी ची अंत्यत मोलाची भूमिका राहली आहे.