शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात लसीकरणासाठी डॉक्टरांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:33 IST

बुलडाणा : तालुका व शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनू पाहत असताना बुलडाणा शहरासह लगतच्या सेमी अर्बन भागातील सुमारे दीड लाख ...

बुलडाणा : तालुका व शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनू पाहत असताना बुलडाणा शहरासह लगतच्या सेमी अर्बन भागातील सुमारे दीड लाख नागरिकांच्या लसीकरणासाठी महसूल, पालिका प्रशासनाने लसीकरण केंद्रांसाठी पाच जागा शोधल्या आहेत. मात्र, डॉक्टरांचीच कमतरता असल्याने ही लसीकरण केंद्र सुरू होत नसल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे बुलडाणा शहर व परिसरातील कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता, बुलडाणा शहरासह लगतचा सेमी अर्बन भाग असलेल्या सुंदरखेड, सागवन, सावळा, जांभरून या भागात लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. मात्र, प्रयत्न करूनही त्यात यश येत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बुलडाण्यासाठी अन्य तालुक्यातून उपलब्ध होत असलेले लसीकरणाचे अतिरिक्त डोस हे तालुक्यातील ग्रामीण भागात पाठविण्याची वेळ आली आहे. आरोग्य विभागातील काही डॉक्टर व कर्मचारी हे या कामासाठी पूर्णवेळ देत नसल्याचीही ओरड आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बुलडाणा शहर व ग्रामीण भागातील लसीकरणाचे कामही जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पाहात आहे. मुळातच या पाच केंद्रांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे वैद्यकीय अधिकारी व तत्सम आरोग्य कर्मचारीच उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने याबाबत नियोजन करून त्वरित ही केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे.

--आमदार गायकवाडांची डीएचओंशी चर्चा--

आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा शहरासह लगतच्या सेमी अर्बन भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यास प्राधान्य देण्याची भूमिका मांडली असून, तहसीलदार रुपेश खंडारे, पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे, ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्याशीही यासंदर्भात चर्चा केली आहे. त्यांचे बुलडाण्यातील नियोजन पाहिल्यानतंर प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. सांगळे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. सोबतच लसीकरण मोहिमेत सहभागी जिल्हा परिषदेचे डॉक्टर दोन तासांच्यावर सेवा देत नसल्याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

--लसीचाही तुटवडा--

बुलडाणा तालुक्यात लसीचाही तुटवडा जाणवत आहे. तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यांना दररोज किमान दीड ते दोन हजार लसींचा पुरवठा केला जातो. त्यामुळे कोरोनाचा अधिक प्रकोप असलेल्या बुलडाणा शहर आणि लगतच्या सेमी अर्बन भागात लसीकरण करण्यात अडचणी येत आहेत. त्यादृष्टीने नियोजन होण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.