शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर पुलावरुन कोसळून एक ठार

By admin | Updated: July 31, 2014 01:29 IST

ढालसावंगी जवळ घडला अपघात, दोन जखमी.

धाड : ग्राम ढालसावंगी नजीक असणार्‍या पुलावर आज दुपारी साधारण १२ वाजता सुमारास एसटी बसचा आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघाता ट्रॅक्टर पुलावरुन थेट नाल्यात कोसळल्याने या घटनेत १ ठार तर २ जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. अजाबसिंग नारायण सोळंकी असे मृतकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, धाड-बुलडाणा रोडवर ग्राम ढालसावंगी जवळ असणार्‍या नाल्यावर आज दुपारी १२ वाजता सुमारास एस.टी. आणि ट्रॅक्टरचा अपघात घडला. यातील ट्रॅक्टर क्र. एम.एच. २८ टी ८७८९ हा बुलडाणा कडून धाडला येत होता. त्याचे पाठीमागे असणारी पैठण -बुलडाणा ही बस (बस क्र. एम.एच.१४ बीटी २२४0) बुलडाण्यावरुन पैठणकडे जात होती. या बसने ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले त्यावेळी ट्रॅक्टरच्या मागे असलेले पेरणीयंत्र बसच्या टायरमध्ये गुंतल्याने हा ट्रॅक्टर पुलावरुन थेट नाल्यात कोसळला. ह्या ट्रॅक्टरवर रमाकांत उत्तम वारे, अजाबसिंग नारायण सोळंके व भानूदास उत्तम नरोटे हे तीघे होते. सदर घटनेत हे तिघेही गंभीररित्या जखमी झाले. घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊ उलटा झालेला ट्रॅक्टर सरळ करुन त्याखालून तीघांना बाहेर काढले व तात्काळ वाहनातून पुढील उपचारार्थ बुलडाण्यास रवाना केले. मात्र तोवर ह्या ठिकाणी असणार्‍या बसचे चालक व वाहक तेथून पसार झाले होते. उपचारा दरम्यान अजबासिंग सोळंके यांचा मृत्यू झाला असुन दोघांना उपचारार्थ बुलडाणा येथून औरंगाबाद कडे हलविण्यात आले आहे. दरम्यान भाऊराव वारे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार धाड पोलिसांनी पैठण आगाराचे एस.टी.चालक रमेश भाऊराव पवार यांचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.