शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘खविसं’ने अडविला तुरीचा धनादेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:54 IST

संग्रामपूर : तालुक्यातील आवार येथील शेतकरी एकनाथ दुतोंडे यांनी खरेदी विक्री संघाला १५ मे २०१७ रोजी २५ क्विंटल तूर विक्री केली होती. या विक्री केलेल्या तुरीच्या मालाचा १ लाख २६ हजार रुपयांचा धनादेशही खविसंने त्यांना दिला होता.

ठळक मुद्देशेतक-याने केली सहायक निबंधकांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील आवार येथील शेतकरी एकनाथ दुतोंडे यांनी खरेदी विक्री संघाला १५ मे २०१७ रोजी २५ क्विंटल तूर विक्री केली होती. या विक्री केलेल्या तुरीच्या मालाचा १ लाख २६ हजार रुपयांचा धनादेशही खविसंने त्यांना दिला होता. मात्र, खविसंने या शेतकºयाचे पेमेंट स्टॉप केल्यामुळे हा धनादेश बँकेतून परत आला. त्यामुळे याबाबतची तक्रार संबंधित शेतकºयाने सहा. निबंधक सहकारी कार्यालय संग्रामपूर यांच्याकडे २९ जुलै रोजी केली आहे.दिलेल्या तक्रारीत नमूद आहे, की २५ क्विंटल तूर ही खरेदी विक्री संघाच्या तूर खरेदी केंद्रावर रीतसर बाजार समितीमध्ये आवक रजिस्टरमध्ये नोंद करून व टोकन घेऊन विक्री केली होती.या विक्री केलेल्या तुरीचा ०१९२७६ क्रमांकाचा १ लाख २६ हजार २५० रुपयांचा धनादेश संग्रामपूर खरेदी विक्री संघाकडून २० जुलै २०१७ रोजीचा बनलेला शेगाव येथील एचडीएफसी बँकेमध्ये जमा केला. त्यानंतर २४ जुलै रोजी हा धनादेश परत आला. सदर शेतकºयाने एचडीएफसी बँकेचा मेमो बघितला असता रिटर्न कोड क्र.(२०) पेमेंट स्टॉप्ड बाय डायव्हर ही बाब उघडकीस आली.हा धनादेश खरेदी विक्रीने नाहक अडवून फसवणूक केल्याचे या तक्रारीत शेतकरी एकनाथ रामचंद्र दुतोंडे यांनी नमूद केले आहे. या तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी बुलडाणा, जिल्हा उपनिबंधक कार्यालय बुलडाणा, सहा. निबंधक जळगाव जामोद यांना पाठविण्यात आल्या आहेत.ऐन कामाच्या दिवसात शेतकºयांना त्राससध्या शेतातील पीक मशागतीचे दिवस सुरु असून, शेतकºयांना पैशांची नितांत गरज भासत आहे. या कामासाठीच शेतकरी तजवीज करुन ठेवत असतात. शेतमालाला भाव नसतानाही नाईलाजाने ते तो विकतात. मात्र, पैसे देताना नाहक त्रास दिला जात असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.धनादेशप्रकरणी ‘खविसं’च्या व्यवस्थापकास अहवाल मागितलासंग्रामपूर: तालुक्यातील आवार येथील शेतकºयाने विक्री केलेल्या तुरीपोटी १ लाख २६ हजार रुपयांचा धनादेश खविसंने संबंधित शेतकºयांस दिला होता; मात्र खविसंने या शेतकºयाचे पेमेंट स्टॉप केल्यामुळे हा धनादेश परत आला होता. याबाबत संबंधित शेतकºयाने सहायक निबंधक सहकारी कार्यालय संग्रामपूर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सहकार अधिकारी श्रेणी-१ यांनी खविसंच्या व्यवस्थापकास संबंधित शेतकºयाचे पेमेंट का स्टॉप केले, याबाबत अहवाल मागितला आहे. तसे पत्र सहकार अधिकारी श्रेणी-१ यांनी खविसंच्या व्यवस्थापकास २९ जुलै रोजी दिले आहे.आवार येथील शेतकरी एकनाथ दुतोंडे यांना खरेदी-विक्री संघाचा धनादेशही खविसंने शेतकरी दुतोंडे यांनी दिला होता; मात्र खविसंने या शेतकºयांचे पेमेंट स्टॉप केल्यामुळे हा धनादेश बँकेतून परत आला. त्यामुळे याबाबतची तक्रार २९ जुलै २०१७ रोजी सहायक निबंधक सहकारी कार्यालय संग्रामपूर यांच्याकडे शेतकरी एकनाथ दुतोंडे यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत सहकार अधिकारी श्रेणी-१ सहकारी संस्था, तालुका संग्रामपूर यांनी संग्रामपूर तालुका सहकारी खरेदी-विक्री समितीच्या व्यवस्थापकास संबंधित शेतकºयाचे पेमेंट का स्टॉप केले, याबाबत २९ जुलै रोजी अहवाल मागितला.