शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यपूर्व काळापासून बससुविधेपासून वंचित असलेले गाव ‘खामखेड’

By admin | Updated: April 26, 2017 14:10 IST

तालुक्यातील खामखेडया गावात अद्यापपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचलेली नाही.

चिखली : भारताला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे उलटूनही तालुक्यातील खामखेडया गावात अद्यापपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचलेली नाही.त्यामुळे या गावात तातडीने नियमित बसफेरी सुरू करण्यात यावी, अशी मागणीजिल्हा काँग्रेस सेवादलाचे संघटक रविंद्र डाळीमकर यांनी केली आहे.याबाबत चिखली आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तालुक्यातील खामखेड हे सुमारे २ हजार लोकवस्तीची गाव असून या गावातआजपर्यंत केवळ मतदानाच्या पेट्या नेण्याव्यतिरिक्त बस कधी फिरकलेली नाही.त्यामुळे दळणवळणासाठी मोठी कसरत करावी लागते. तसेच बसफेरी अभावी शाळकरीमुलांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्यासाठी तसेच रूग्ण व वृध्दांनाअतिरिक्त भूर्दंड सोसावा लागतो. आजरोजी खामखेड व कव्हळा येथील सुमारे १५०ते २०० विद्यार्थी शिक्षणासाठी नियमितपणे चिखली येथे ये-जा करतात. तसेचखामखेड गावासाठी ग्रामपंचायत कार्यालय करणखेड येथे असून खामखेड ते करणखेडअंतर ७ किमीचे असल्याने बससुविधेअभावी खासगी प्रवासी वाहतुकीचा आधारघ्यावा लागतो व यामुळे आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असून सद्यस्थितीतकव्हळा फाटा ते खामखेड रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले असल्यानेरस्त्याची समस्या राहली नाही. याची दखल घेत ग्रामस्थांच्या सुविधेसाठीखामखेड, गोंधनखेड, कव्हळा अशी नियमितपणे बसफेरी सुरू करण्यात यावी, अशीमागणी रविंद्र डाळीमकर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)