शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव, लोणार बसस्थानकाचा होणार कायापालट!

By admin | Updated: December 25, 2015 03:21 IST

बसस्थानकांचे होणार आधुनिकीकरण; १.८0 कोटी मंजूर.

बुलडाणा: जागतिक कीर्तीचे खार्‍या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार आणि मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावर असलेले व जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या खामगाव या दोन शहराच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. यासाठी महामंडाळाने १ कोटी ८0 लाख रुपये मंजूर केले आहेत. राज्य परिवहन महामंडळाचे बुलडाणा जिल्ह्यात सात बस डेपो आहेत तर तालुक्याच्या १३ ठिकाणी बसस्थानके आहेत. दररोज १ लाख ५0 हजार किमी ऑपरेशन होते. त्यासाठी ५१७ बसेस असून, ९६७ चालक आणि ९३२ वाहक आहेत. बुलडाणा हे जिल्ह्याचे ठिकाण वगळता इतर तालुक्याच्या ठिकाणच्या बसस्थानकांची स्थिती फारशी चांगली नाही. वाढत्या स्पर्धेच्या युगात प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एसटीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. शिवाय प्रवाशांना बसस्थानकावर अधिकाधिक सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, याकडे एसटीने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बसस्थानकाचे टप्प्या-टप्प्याने आधुनिकीकरण करण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. यामध्ये प्राधान्य क्रमाने खामगाव आणि लोणार येथील बसस्थानकाची निवड करण्यात आली आहे. लोणार येथे जागतिक कीर्तीच्या खार्‍या पाण्याचे सरोवर असल्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. जगाच्या नकाशावर लोणार शहराचे नाव झळकत असले तरी लोणार शहराचा पाहिजे तसा विकास झाला नाही. एसटीने मात्र बसस्थानक अत्याधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रारंभी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या निधीमधून बसस्थानकाची प्रशस्त ईमारत, प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी आसन व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, सुलभ शौचालय, व्यापारी संकुल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. सदर कामास मंजुरात मिळाली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.