शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव: कोरोना लसीकरणाचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 11:14 IST

Khamgaon News : लसीकरण सुरळीत करण्यासाठी प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचे मंगळवारी दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना प्रतिबंधासाठी कोविड-१९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे लसीकरण मोहीम वांद्यात सापडली असतानाच, लसीकरणासाठी गर्दी नियंत्रित करण्यासाठी तसेच लसीकरण सुरळीत करण्यासाठी प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचे मंगळवारी दिसून आले.लसीकरण सुरू असतानाच ऐनवेळी लसीकरण केंद्रावर सावलीसाठी मंडप टाकण्यात आला. गर्दी नियत्रंणात आणण्यासाठी चक्क पोलिसांना प्रयत्न करावे लागले. खामगाव येथील टॉवर चौकातील नगर परिषद दवाखान्यात आधी हे लसीकरण केंद्र सुरू होते. मात्र या ठिकाणी इतर रुग्ण व लसीकरणासाठी येणारे नागरिक यामुळे दररोज मोठी गर्दी होत होती. त्यामुळे हे लसीकरण केंद्र सिव्हिल लाईन भागातील न.प. शाळा क्र. ९ मध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी या ठिकाणी दुसरा डोस घेणाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी सकाळपासूनच लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. लसीकरण केंद्रावर कुठलेही नियोजन नसल्याने नागरिकांनी एकच झुंबड केल्याचे दिसून आले. लस मिळावी यासाठी नागरिक चढाओढ करीत होते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव