शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव कृउबासमधील व्यापाऱ्यांचा बंद!

By admin | Updated: July 4, 2017 00:09 IST

जीएसटीबाबत संभ्रम : व्यापाऱ्यांमध्ये धास्ती

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जीएसटी कर प्रणालीबाबत संभ्रम असल्याने येथील कृउबासमधील अडते व व्यापाऱ्यांनी सोमवारी व्यवहार न करता बंद पाळला. वेगवेगळे कर असणारी प्रणाली रद्द करत केंद्र सरकारने १ जुलैपासून देशात जीएसटी ही एक कर प्रणाली लागू केली. याबाबत अद्याप पुरेपूर माहिती नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम दिसून येत आहे, यामुळे येथील कृउबासमधील अडते व व्यापारी यांनी सोमवारी बंद पाळला. यामुळे बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले होते. जीएसटी कर प्रणालीबाबत कृउबासच्या व्यापाऱ्यांसाठी दु.४ वा. सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारनंतर जीएसटीबाबतचे संभ्रम दूर होण्यास मदत होऊ शकते. दरम्यान, सोमवारी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांसाठी सेमिनार आयोजित करण्यात आला. यावेळी अकोला येथील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.आॅनलाइन लॉटरी सेंटरधारकांचाही बंदनव्याने लागू झालेल्या जीएसटी कर प्रणालीनुसार लॉटरीवर २८ टक्के कर लागला असून, हा कर ग्राहकांकडून वसूल न करता कंपनीने भरावा, या मागणीसाठी सोमवारी शहरातील आॅनलाइन लॉटरी सेंटरधारकांनी बंद पाळला. याआधी हा कर १८ टक्के इतका होता व तो कर कंपनी भरत होती; मात्र नव्या कर प्रणालीनुसार हा कर ग्राहकांकडून वसूल करण्यात येत आहे. यानुसार १ हजार रुपयाची तिकीटे ग्राहकाने घेतल्यास त्याला १२८० रूपये द्यावे लागत आहे. यामुळे ग्राहक संख्या कमी होण्याची भीती निर्माण झाली असून, याविरोधात शहरातील २८ लॉटरी सेंटरधारकांनी बंद पाळला.