शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील जेतवन बुद्धविहारात भरते ‘संडे स्कुल’

By admin | Updated: October 8, 2016 14:06 IST

शांतताप्रिय समाज निर्माण करण्याकरिता धम्म संस्कार पुढच्या पिढीवर रूजविण्याची जबाबदारी बुलडाण्यातील जेतवन बद्धविहाराने पेलली आहे.

ऑनलाइन लोकमत 
बुलडाणा, दि. ८ -  भगवान गौतम बुद्धांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवून शांतताप्रिय समाज निर्माण करण्याकरिता धम्म संस्कार पुढच्या पिढीवर रूजविण्याची जबाबदारी बुलडाण्यातील जेतवन बद्धविहाराने पेलली आहे. महिनाभरापासून जेतवन बुद्धविहारामध्ये ‘संडे स्कुल’ अर्थात बुद्धधम्म संस्कार प्रशाला भरवून मुलांना बुद्धधम्म संस्काराचे धडे दिले जात असल्याने मुलांच्या रविवारच्या सुट्टीचा सदुपयोग होत आहे.
तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म जीवन जगण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक धर्माचा अभ्यास केल्यानंतर धम्मदीक्षा घेतली. जगाला आज धम्माच्या शिकवणीची आवश्यकता आहे. बौद्ध धम्माची शिकवण पुढील पिढीकडे संक्रमीत करण्याची जबाबदारी थोरामोठ्यांची असून, धम्माचा प्रसार व प्रचार करण्याकरिता सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 
भगवान गौतम बुद्धांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवून शांतताप्रिय समाज निर्माण करण्याकरिता पुढच्या पिढीवर धम्म संस्कार  रूजविण्यासाठी बुलडाणा येथील जेतवन बद्धविहारामध्ये विदर्भ हाऊसिंग सोसायटीच्यावतीने ‘संडे स्कुल’ भरविण्यात येते. मुलांच्या रविवारच्या सुट्टीचा सदुपयोग होण्यासाठी प्रत्येक रविवारला मुलांना  जेष्ठ विचावंत व बुद्ध धर्माचे अभ्यासक बापुसाहेब गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली जेतवन बुद्धविहारात ‘संडे स्कुल’च्या माध्यमातून बुद्धधम्म संस्काराचे धडे दिले जातात.  
यामध्ये जेतवन बुद्ध विहाराचे अध्यक्ष दिलीपराव जाधव, पी.एस.मेढे, जी.एल.शिरसाट, जी.वाय.बाभुळकर, एच.एन.मोरे, अ‍ॅड.गवई व जेतवन महिला मंडळ यांनी प्रत्येक रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत वय वर्षे ६ ते १२ वयोगटातील मुले व मुली यांच्यावर बुद्ध धर्माचे संस्कार रूजविण्याचे चांगले कार्य  हाती घेतले आहे. गेल्या महिन्याभरापासून धम्म संस्कार पुढच्या पिढीवर रूजविण्याचे कार्य जेतवन बुद्धविहारामध्ये सुरू असून, त्याला मुलांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 
 
नविन पिढीमध्ये  बुद्ध धम्म संस्कार रूजविण्यासाठी बुलडाण्यातील जेतवन बुद्धविहारामध्ये संडे स्कुल अर्थात बुद्धधम्म संस्कार प्रशाला सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांच्या रविवारच्या सुट्टीचा सुद्धा सदुपयोग होत आहे. ५० पेक्षा जास्त मुले बुद्धधम्म संस्कार प्रशालाला उपस्थित राहतात. 
- पी.एस.मेढे, सचिव, जेतवन बुद्धविहार विदर्भ हाऊसिंग सोसायटी, बुलडाणा