शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पंधराशे कोटींच्या खर्चानंतरही जिगाव प्रकल्प अधांतरी

By admin | Updated: November 14, 2015 02:28 IST

नांदुरा तालुक्यात मातीची भिंत व सांडव्याचे काम सुरू होईना.

सुहास वाघमारे /नांदुरा (जि. बुलडाणा): राज्यातील मोठे सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दशकांचा कालावधी लागला. तोच प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाबाबत घडत आहे. पंधराशे कोटी रुपयांचा आतापर्यंंंत खर्च केल्यानंतरही प्रकल्प अधांतरी असून, मागील वर्षी नगण्य काम झाल्यानंतर यावर्षी शेतकर्‍यांचा विरोध असल्याने मातीची भिंत व सांडव्याचे काम पुन्हा एकदा बंद पडले आहे. प्रकल्पाच्या मातीच्या भिंतीचे काम सुरू करण्यासाठी २00७ मध्ये शेतकर्‍यांनी सरळ खरेदीने शेतजमिनी दिल्या. त्यावेळी त्यांना सरासरी एकरी ९0 हजार रुपये एवढाच मोबदला मिळाला होता; मात्र सद्यस्थितीत धरणाच्या इतर कामांसाठी संपादित केल्या जाणार्‍या शेतीला सात ते आठपट एवढा मोबदला मिळत असल्याने आधी शेतजमिनी देणार्‍या शेतकर्‍यांनी उपोषण केले तसेच धरणाच्या मातीच्या भिंती व सांडव्याच्या कामाला विरोध करून काम बंद पाडले आहे. विजयादशमीला ठेकेदाराने विधिवत पूजन करून कामास प्रारंभ केला; मात्र शेतकर्‍यांनी त्याला विरोध करून आधी उपोषण व आता काम बंद ठेवण्यास यंत्रणेला बाध्य केले आहे. त्यामुळे बंद अवस्थेतील लाखो रुपयांची यंत्रसामग्री, बसून असलेला मजूर वर्ग व आंदोलनातून विरोध करणारे शेतकरी असे चित्र धरणस्थळी आहे. त्यामुळे यावर्षी अद्यापही मातीच्या भींती व सांडव्याचे काम सुरूझाले नाही. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर प्रकल्प पुन्हा रेंगळणार आहे. जिगाव प्रकल्पाच्या कामाला सुरुवातीला प्रकल्पग्रस्तांचा मोठा विरोध होता. यंत्रसामग्री जाळण्यापासून ते अधिकार्‍यांच्या कपडे फाडण्यापर्यंंंत व वेळोवेळी काम बंद पाडणारी आंदालने झाली; मात्र आता प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या शेतीचा व घरांचा नवीन कायद्यानुसार मोबदला हवा आहे. त्यांची ही मागणी प्रशासनाने तात्काळ व प्राधान्याने पूर्ण केली, तर प्रकल्पाच्या कामाला विरोध होणार नाही; मात्र पुर्नवसनाच्या कामाला व मोबदला वितरित करायला वेळ लागत असल्याने प्रकल्पाच्या कामाला खीळ बसली आहे. पाटबंधारे विभाग व प्रशासन यांनी तत्काळ संपादित जमिनीचा व घरांचा मोबदला द्यावा, ही मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे, नाही तर लाखो रुपयांची धूळखात गंजून निकामी होत असलेली यंत्रसामग्री व धरणस्थळी बसून असलेले मजूर हे चित्र कायम राहिले व मातीची भिंत तथा सांडव्याच्या कामाला गती मिळणार नाही. पंधराशे कोटी रुपयांच्या खर्चानंतरही प्रकल्प अधांतरीच राहील.