शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक बालविकास प्रकल्पाला समस्यांचे ग्रहण

By admin | Updated: June 16, 2016 02:16 IST

चिखली तालुक्यातील दोन स्वतंत्र कार्यालयांचा प्रस्ताव धूळ खात पडून

सुधीर चेके पाटील / चिखली (जि. बुलडाणा)मुले हीच राष्ट्राचे भविष्य असल्याने त्यांची जडणघडण, विकास आणि संवर्धन व्हावे म्हणून केंद्र शासनाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजना (अंगणवाडी) सुरू आहे; मात्र गेल्या ३0 वर्षांंंपासून प्रत्येक गावात अंगणवाडी कार्यान्वित असूनही बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण कमी होत नसल्याने त्याचे खापर अंगणवाड्यांवर फोडले जाते. वस्तुत: कुपोषण निर्मूलनासह बालकांची जडणघडण होण्याइतपत अंगणवाड्या सक्षम आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असून, अपुरे कर्मचारी, उघड्यावरील व जीर्ण इमारतींमध्ये भरणार्‍या अंगणवाड्या, सुमार दर्जाचा पोषण आहार यांसह इतरही अनेक अपुर्‍या सुविधांमुळे तालुक्यातील बालकांचे भवितव्य आजमितीला धोक्यात आल्याचे चित्र आहे.चिखली तालुक्यातील सहा सर्कलमध्ये ३२३ अंगणवाडी केंद्रे व आठ मिनी अंगणवाडी केंद्रे अशा एकूण ३३१ अंगणवाड्या कार्यरत असून, या अंगणवाडी केंद्रांमार्फत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ आरोग्य सेवा, आरोग्य आणि सकस आहारविषयक शिक्षण आणि अनौपचारिक शालेय पूर्वशिक्षण या सहा महत्त्वाच्या सेवा दिल्या जातात. असे असतानाही कुपोषणाबाबत हा तालुका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. साहजिकच याचे खापर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पावर फोडले जाते; मात्र ही जबाबदारी त्यांची असली तरी कुपोषण निर्मूलनासह अंगणवाडीतून बालकांना दिल्या जाणार्‍या सहा महत्त्वपूर्ण सेवा देण्यासाठी तालुक्यातील अंगणवाड्या सक्षम नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील एकूण ३३१ अंगणवाड्यांचा संपूर्ण भार येथील ग्रामीण एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प चिखलीचे बालविकास प्रकल्प अधिकारी गट ब वर्ग-२ यांच्यावर असून, या कार्यालयात कर्मचारी संख्या अपुरी आहे. गेल्या नऊ वर्षांंंपासून प्रकल्पास वाहनही उपलब्ध नाही. त्यातच ३३१ पैकी केवळ ११७ अंगणवाडी केंद्रांनाच इमारत असून, त्यापैकी अनेक इमारतींची पडझड झालेली आहे. अनेक इमारती जीर्णावस्थेत असून, बालकांचे जीव धोक्यात आहे.