शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक शेतीसाठी ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 20:21 IST

हिवरा आश्रम (बुलडाणा) : शेतीच्या समृध्दीसाठी शेतक-यांना शेतीसंबंधी आधुनिक माहिती उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता विवेकानंद महाविद्यालयाच्यावतीने ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’ सुरू करण्यात आला आहे. याव्दारे शेतकºयांसाठी आधुनिक शेती संबधीत माहिती, शेतकरी यशोगाथा, शेती पुरक व्यवसाय माहिती, कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, बागायती शेती, पशू पालन, फळबाग लागवड यासंबंधी माहिती देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबळीराजाच्या ज्ञानात पडणार भरआधुनिक शेती संबधीत देण्यात येणार माहिती 

ओमप्रकाश देवकरलोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम (बुलडाणा) : शेतीच्या समृध्दीसाठी शेतक-यांना शेतीसंबंधी आधुनिक माहिती उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता विवेकानंद महाविद्यालयाच्यावतीने ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’ सुरू करण्यात आला आहे. याव्दारे शेतकºयांसाठी आधुनिक शेती संबधीत माहिती, शेतकरी यशोगाथा, शेती पुरक व्यवसाय माहिती, कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, बागायती शेती, पशू पालन, फळबाग लागवड यासंबंधी माहिती देण्यात येणार आहे.हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या विद्यार्थींनींनी ग्रामपंचायत कार्यालयात इन्फॉर्मेशन कॉर्नर सुरू केले आहे. याबाबत गुरूवारी हिवराआश्रम येथे शेतकºयांना माहिती देण्यात आली. यावेळी मुंगशीदेव डाखोरे, प्रा.विश्वनाथ गव्हाळे, विशाल घागरे, अजयअवसरमोल, दशरथ साबळे, अमोल अंभोरे, शरद तुपकरी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. भारत हा देश कृषि प्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातीत नागरीक शेती व शेतीशी संबंधी रोजगारावर अवलंबून आहे. शेतकºयांनी आपल्या चाकोरीच्या बाहेर पडून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीची उत्पादकता व उत्पन्न वाढवावे. शेतीच्या समृध्दीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, पारंपरिक पद्धतीने पीक घेण्याच्या पद्धतीमुळे पिकाचे उत्पन्न कमी येते म्हणून शेतकºयाने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होते. देशातील साक्षर पिढी शेती व्यवसायात उतरत आहे. त्यामुळे शेती व्यवसायात होत असलेल्या नवनवीन बदलांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यांत्रिकीकरणाच्या वापरामुळे मनुष्यबळाचा वापर कमी होऊन कामाची गुणवत्ता सुधारते. यामुळे पारंपारिक शेतीमध्ये बदल करून तुषार, ठिबक सिंचनाच्या सहाय्याने बागायती शेती करावी, अशी माहिती यावेळी शेतकरी बांधवांना देण्यात आली. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी सृष्टी ग्रुपमध्ये शीतल फुपाटे, सोनम इंगळे, चैताली भालेराव, पुनम आव्हाड, पल्लवी काळे, मनिषा भोरकडे, विपश्यना इंगोले, प्रीती कदम, पूजा कुणबीथोप या विद्यार्थींनींचा समावेश आहे. विवेकानंद कृषी सृष्टी ग्रुपच्या विद्यार्थींनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, प्रा.मनोज खोडके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

शेतकरी बांधवांसाठी इन्फॉर्मेशन कॉर्नर अत्यंत महत्वपूर्ण आहे. शेतकरी बांधवांना या फलकाच्या माध्यमातून विविध उपयुक्त माहिती देण्याची व्यवस्था विवेकानंद कृषी सृष्टी ग्रुपच्या विद्यार्थींनींनी केली आहे.- डॉ. सुभाष कालवे, प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय, हिवराआश्रम.

इन्फॉर्मेशन कॉर्नरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी बांधवाच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल . या फलकावरील   माहिती नियमित अद्यावत करण्यात येणार आहे.- मंजुषा क-हाडे, विद्यार्थीनी, विवेकानंद कृषी, महाविद्यालय.