शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

तूर पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 30, 2015 02:04 IST

कृषी विभागाने सुचविल्या उपाययोजना ; १८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित.

बुलडाणा : मलकापूर, मोताळा, बुलडाणा व चिखली या तालुक्यात १८ हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा करण्यात आला असून, या तूर पिकावर विविध प्रकारच्या अळय़ांनी आक्रमण केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी अपुर्‍या पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट झाली. कपाशी पिकानेही दगा दिला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा तूर पिकावर होत्या. तथापि, तुरीवरसुद्धा अळ्यांनी आक्रमण केल्याने तुरीच्या उत्पादनात सुद्धा घट होण्याची दाट शक्यता आहे. सध्या शेतकरी सोयाबीन सोंगणीत व रब्बीच्या तयारीत असल्याने तुरीला संरक्षित पाणी देण्याकडे दुर्लक्ष झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर मध्यंतरी वातावरणात झालेल्या बदलामुळे तूर पिकावर ४ प्रकारच्या अळ्यांनी आक्रमण केल्याचे दिसत आहे. उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कीड नियंत्रक भगवान कुळकर्णी व १८ कर्मचार्‍यांच्या सर्वेक्षक चमूने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. यापैकी शेंगा पोखरणार्‍या अळीचा पतंग पिवळसर असून, पुढील पंखावर काळे ठिपके तर मागील पंखाच्या कडा धुरकट रंगाच्या आहेत. ही अळी लहान असताना पानांवर तर पीक फुलोर्‍यावर असताना कळ्या, फुले व शेंगावर हल्ला चढविते. शेंगावर छिद्र पाडून अर्धी बाहेर राहून कच्चे दाणे फस्त करते. पिसारी पतंग असे नाव असलेली अळी लहान असताना कळ्या, फुले व शेंगांचा तर मोठी अळी दाण्यांचा फडशा पाडते. घाटे अळीनंतर शेंग माशी पिकांसाठी अतिघातक ठरते. पाने गुंडाळणारी अळी कळ्या फुले व शेंगाही उद्ध्वस्त करते.