शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:12 IST

हिवरा आश्रम: मेहकर उप विभागांतर्गत येणार्‍या ३८ हजार ३१३  हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव  दिसून येत आहे. याबाबत अनेक शेतकरी तक्रार करीत असून,  क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देक्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना मार्गदर्शनअळय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करा

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम: मेहकर उप विभागांतर्गत येणार्‍या ३८ हजार ३१३  हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव  दिसून येत आहे. याबाबत अनेक शेतकरी तक्रार करीत असून,  क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मेहकर उप विभागांतर्गत मेहकर - ७८0, लोणार - १0१९,  सिंदखेडराजा- १७३३८, देऊळगावराजा - १९१७६ असे एकूण  ३८३१३ हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाची लागवड झालेली असून,  पीक फुलोरा व बोंडे पक्व होण्याच्या अवस्थेत आहे; परंतु  िपकावर प्रामुख्याने ठिपक्याची बोंडआळी, हिरवी बोंडअळी,  शेंदरी बोंडअळी व तंबाखूची पाने खाणार्‍या अळीचा प्रादुर्भाव  दिसून येत आहे. पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प  सन २0१७-१८ अंतर्गत पिकाची पाहणी करण्यात येत असून,  सिंदखेडराजा तालुक्यातील कापूस पिकावर सध्या शेंदरी  बोंडआळीचा प्रादुर्भाव दिसून  येत आहे.  शेंदरी बोंडअळीचा प तंग लहान असून, तो गर्द बदामी रंगाचा असतो आणि पंखावर  बारीक काळे ठिपके असतात. अंड्यातून बाहेर आलेली अळी  प्राथमिक अवस्थेत पांढर्‍या रंगाची असून, डोके तपाकिरी रंगाचे  असते. पूर्ण वाढ झालेली अळी ११ ते १३ मिमी लांब व गुलाबी  रंगाची दिसते. सुरुवातीला अळ्या पाते, कळ्या व फुलावर उ पजीविका करतात. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या  गुलाबी कळीसारख्या दिसतात. अशा कळ्यांना डोमकळी म्हण तात. प्रादुर्भावग्रस्त पाते व बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न  होताच फुटतात. बोंडातील अळ्या रुइमधून छिद्र करून सरकी  खातात. त्यामुळे रुईची प्रत खालावते, अशी माहिती सुधाकर  कंकाळ कीड नियंत्रक मेहकर यांनी दिली. 

अळय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना कराशेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी  अर्काची फवारणी करावी किंवा बिव्हेरिया बसियाना किंवा  मेटारायझियम अनिसोप्ली १.५ टक्के विद्राव्य घटक असलेली  भुकटी (२.५ किलो प्रती हेक्टर) ४0 ग्रॅम प्रती १0 लीटर पाण्या त मिसळून वातावरणात आद्र्रता असताना फवारणी करावी.  किडीने आर्थिक नुकसान पातळी (५-१0 टक्के कीडग्रस्त पा त्या, फुले, बोंडे ) ओलांडल्यास  क्विनॉलफॉस २५ ईसी. २0  मिली किंवा प्रोफेनोफॉस ५0 ई.सी. २0 मिली किंवा थायोडीकार्ब  ७५ डब्लूपी २0 ग्रॅम किंवा  लॅमडा सायहॅलोथ्रिन ५ ई.सी.१0  मिली किंवा सायपरमेथ्रीन १0 ई.सी. १0 मिली प्रती १0 लीटर  पण्यात मिसळून फवारणी करावी. वरील मात्रा साध्या पंपासाठी  असून, पेट्रोल पॉवर स्प्रे पंपासाठी हे प्रमाण तिप्पट करावे, अशी  माहिती उपविभागीय कृषी अधिकारी गणेश गिरी यांनी दिली.