शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना संवर्ग प्रमाणपत्र नाही!

By admin | Updated: July 18, 2016 02:37 IST

उद्योगांची रेड, ऑरेज व ग्रीन श्रेणी ठरली नाही!

नीलेश शहाकार / बुलडाणा कोणताही उद्योग व त्यातून होणार्‍या वस्तूनिर्मितीमुळे पर्यावरणास घातक आहे किंवा नाही, याची प्रदूषण मंडळाकडून चाचपणी करून रेड, ऑरेंज व ग्रीन असे संवर्ग प्रमाणपत्र उद्योगांना देण्यात येते. जिल्ह्यात लहान-मोठे एकूण ९९५ उद्योग व प्रकल्प सुरू असल्याची नोंद जिल्हा उद्योग केंद्राकडे आहे. मात्र एकाही उद्योगाची अद्यापही संवर्ग प्रमाणपत्र देण्याबाबत तपासणी झाली नसल्यामुळे या उद्योगांचा पर्यावरणास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.बुलडाणा जिल्ह्यात धान्यावरील प्रक्रिया, तेल व चरबी उद्योग, खाद्यजन्य पदार्थ उत्पादन, लाकूड गिरणी, कागद प्रक्रिया, रसायने, खत आणि नायट्रोजन कंपाऊड, सिथेंटिक रबर उत्पादन, जैविक उत्पादने, अधातू उत्पादन, मूलभूत लोखंड प्रक्रिया व धातूकाम, दाग-दागिने उत्पादन, पाणी प्रक्रिया, मोटार दुरुस्ती, साठवण असे उद्योग असल्याची नोंद जिल्हा उद्योग केंद्रात आहे.या उद्योगांमुळे जल प्रदूषण, वायू प्रदूषण व इतर पर्यावरणाची हानी होत आहे का? याची प्रदूषण महामंडळ तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई यांच्याकडून प्रत्येक वर्षाला तपासणी करून श्रेणी ठरविली जाते. त्यांना रेड, ऑरेंज व ग्रीन असे संवर्ग प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र, ही बाब गांभीर्याने न घेता, जिल्हा उद्योग केंद्रांकडून अद्यापही अशी संवर्ग प्रमाणपत्र देण्याबाबत उद्योगांची तपासणी झाली नाही, हे विशेष.