शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विशेष अधिवेशन घेऊन शक्ती कायदा अमलात आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST

महिलांवर अत्याचाराबाबत असुरक्षित महिलांनी राज्यपालांकडे सुरक्षेबाबत केलेल्या याचनेवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विशेष अधिवेशन घेऊन वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांवर ...

महिलांवर अत्याचाराबाबत असुरक्षित महिलांनी राज्यपालांकडे सुरक्षेबाबत केलेल्या याचनेवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विशेष अधिवेशन घेऊन वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांवर उपाययोजना करण्याची मागणी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या पत्रावर कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न करता व राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्याची असताना केंद्राकडे बोट दाखवून या घटनेचेसुद्धा मुख्यमंत्री राजकारण करीत आहेत, असा आरोप आ. श्वेता महाले यांनी केला. याबाबत आ.महालेंनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्रदेखील लिहिले आहे. राज्यपालांकडे जनतेकडून आलेली पत्रे, त्यातील समस्या याबाबत राज्यपाल सरकारकडे पाठवून त्यावर कार्यवाही करण्याचे सुचवीत असतात. त्याचप्रमाणे महिलांच्या अत्याचाराबाबत राज्यभरातील महिलांकडून आलेल्या मागणीनुसार राज्यपाल राज्यशासनास उपाययोजना करण्याबाबत सुचविले होते. ही प्रशासकीय कार्यवाही असताना मुख्यमंत्र्यांनी त्यावर उपाययोजना न करता राज्यपालांना त्यावर उलट पत्र लिहिणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिलीच घटना असावी, अशी टीका देखील आ.महाले यांनी केली आहे. राज्याची कायदा-सुव्यवस्था, महिलांची आणि एकूणच जनतेची सुरक्षा हा संपूर्णपणे राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असतो. राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात तसा उल्लेख केल्याचे आढळते; परंतु कायदा सुव्यवस्थेशी संबंधित विषय राज्याच्या गृहखात्याशी संबंधित असल्याने मुख्यमंत्री कार्यालयाशी त्याचा संबंध नाही असे अन्य एका संदर्भात स्पष्ट केल्याचा उल्लेख गृहखात्याने केल्याची माहिती प्रसृत झाल्यामुळे, राज्यात रसातळाला गेलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत आणि दिवसागणिक महिलांवर सुरू असलेल्या तालिबानी अत्याचारांबाबत आपणांस वा आपल्या कार्यालयास त्याची नेमकी कल्पना असेल किंवा नाही, याबाबत आम्ही साशंकच असल्याचेही महाले यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

केंद्राकडे बोट दाखविणे योग्य नसल्याची टीका

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून राज्याच्या प्रत्येक समस्येवर केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचे कर्तृत्व ठाकरे यांनी दाखविले असल्याचा आरोप आ.महाले यांनी केला. आता राज्यातील महिला असुरक्षिततेच्या वातावरणात वावरत असतानादेखील संसदेच्या अधिवेशनाची मागणी करून राज्याची अब्रू थेट दिल्लीच्या वेशीवर टांगण्याचा प्रयत्न कशासाठी करत आहात, असा सवालही आ.महालेंनी उपस्थित केला आहे.