बुलडाणा: जिल्हयातील धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईपर्यत जिल्हयातील धरणातील पाणीसाठा फक्त पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात येत आहे. जेही शेतकरी धरणातुन किंवा पिण्याचे पाणी जेथे आहे तेथुन पाण्याचा शेतीसाठी मोटारीने पाणी घेत असतील त्या मोटारी त्वरीत जप्त करण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी पारित केले आहेत. यांचे पालन न झाल्यास संबधित यत्रणेवर कार्यवाही करण्यात येईल असेही आदेशात नमुद आहे. जिल्हयातील अवैध उपसा न होण्यासाठी व जनावरांना पुरेसे पाणी पुरण्यासाठी कृषि पंप धारक यांनी आपले पंप काढुन घेवुन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. बुलडाणा जिल्हयामध्ये अद्यापपर्यत समाधानकारक पर्जन्यमान झालेले नसुन जिल्हयातील धरणामध्ये पुरसा पाणीसाठी उपलब्ध झाला नाही. पाऊस काही काळ लांबल्यास ग्रामीण नागरी भागात पाणी टचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुसार धरणातील पाणीसाठा पुरेसा पाऊस पडेपर्यत पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्या बरोबरच विविध धरणातील कृषि पंप त्वरीत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
अवैध उपसा करणारे कृषि पंप जप्त होणार
By admin | Updated: July 2, 2014 23:57 IST