शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी लागणाऱ्या गौण खनिजाचे अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 14:31 IST

डोणगाव-शेलगाव रस्त्या लगत २०० मिटरच्या आत अगदी रस्त्याला लागून खोदकाम होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: समृद्धी महामार्गासाठी लागणारे गौण खनिज मिळविण्याकरीता महामार्गाच्या परिसरात जागो जागी अवैध उत्खनन करण्यात येत आहे. डोणगाव-शेलगाव रस्त्या लगत २०० मिटरच्या आत अगदी रस्त्याला लागून खोदकाम होत आहे. हे खोदकाम शेतकऱ्यांसाठी धोक्याचे ठरत असून, यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे निवेदन येथील एका शेतकरी पुत्राने तहसिलदारांमार्फत जिल्हा अधिकाºयांकडे ८ नोव्हेंबर रोजी दिले आहे.डोणगाव येथील शेतकरी पुत्र मनोज श्रीकृष्ण नव्हाळे यांनी मेहकर तहसीलदारांकडे दीड महिन्या अगोदर एक निवेदन दिले होते. मनोज नव्हाळे यांच्या शेताच्या बाजूला असलेले शेत सुखदेव कोंडुजी लांभाडे यांनी समृद्धी महामार्गासाठी लागणाºया गौण खनिजासाठी दिले. मात्र त्या शेताचे मोजमाप न करताच सरळ खोदकाम सुरू केल्याने शेतात जाण्यासाठी असलेला पांदण रस्ता सुद्धा खोदून टाकला. त्यावर महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या परिसरात मोठ-मोठे खड्डे करण्यात आले आहेत. एकीकडे रस्त्या लगत २०० मिटरपर्यंत कोणतेही खोदकाम करता येत नाही, मात्र डोणगाव-शेलगाव रस्त्या लगत ३० फुटा पेक्षा जास्त खोल खड्डा खोदण्यात आला आहे. तर आजू बाजूच्या शेतकºयाला कोणतीही माहिती न देता शेततळ्याच्या नावावर हा खड्डा खोदण्यात आला आहे. यातील गौण खनिज काढण्यासाठी ब्लास्टिंग घेतले जात आहेत. ब्लास्टिंगच्या हादरा बसल्याने काहींच्या शेतातील बोअर बंद पडल्याचे प्रकार येथे घडले आहेत. शेतालगत असलेल्या खड्यामध्ये ८ नव्हेंबर रोजी गाय पडल्याने जीव धोक्यात घालून शेतकºयांनी गायीला वाचविले. शेतकºयांसाठी हे खड्डे धोकादायक ठरत आहेत. काही दिवसा नंतर या खड्यांमध्ये पाणी झिरपल्याने शेत जमीनी खचू शकतात. त्यामुळे इच्छामरणाची परवानगीच मनोज श्रीकृष्ण नव्हाळे यांनी निवेदनाद्वारे मागितली आहे. तहसिलदांराकडून पाहणी तहसिलदार संजय गरकळ यांनी तलाठ्यासह जाऊन डोणगाव-शेलगाव देशमुख रोडलगतच्या खोदकामाची पाहणी केली. तेंव्हा याठिकाणी असलेला मोठा खड्डा शेतकºयांसाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आले असतानाही त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. शेततळ्याच्या नावावर खोदकाम सुरू असल्या बाबत तहसिलदार गरकळ यांना विचारले असता त्यांनी कुठलीच माहिती दिली नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग