शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचे बांधकाम करुन अतिक्रमण न काढल्यास आंदोलन

By admin | Updated: July 14, 2017 19:45 IST

प्रहार संघटनेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बाणगंगा नदीवरील पुलाचे, राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरु करण्यात यावे तसेच धाड येथील अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे, अशी मागणी प्रहार संघटनेकरून येत्या सात दिवसांमध्ये उपरोक्त समस्या मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचाही इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.याबाबत कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नुमद आहे की, धाड येथील बाणगंगा नदीच्या पात्रावर सिमेंटचे मोठे-मोठे पाईप टाकून पुल बांधण्यात आलेला आहे. सदर पुल हा नागरी वस्तीसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून पाईपधून पाणी वाहून जात नसल्याने पुराचे पाणी गावात शिरत आहे. धाड हे गाव बुलडाणा ते औरंगाबाद जाणाऱ्या राज्यमहामार्गावर वसलेले असून या मार्गाचे महत्व व मोठ्या प्रमाणावरील वाहनांच्या ये-जामुळे या मार्गाला राष्ट्रीय महामागार्चा दर्जा देण्यात आला आहे. तसेच रस्ता बांधकामासाठी करोडो रुपयांचा निधीदेखील देण्यात आला आहे. मात्र सदर रस्त्याच्या बांधकामास अद्यापपर्यंत सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे अरुंद असलेल्या या मार्गावर रस्ता अपघातांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. तसेच मौलाना आझाद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हॉटेल निराळा व बुलडाणा अर्बन बँक दरम्यान अनेक व्यावसायीकांनी आपले दुकाने थेट रस्त्यापर्यंत थाटली आहेत. आधिच अरुंद असलेल्या रस्त्यापर्यंत अतिक्रमण आल्याने वाहनधारकांना वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नव्हे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. धाड हे गाव शासन दरबारी अतिसंवेदशील म्हणून गणल्या जाते. छोट्या-मोठ्या कारणांवरुन या ठिकाणी बऱ्याचवेळा जातीय तणाव निर्माण झाले आहेत. वाढलेल्या अतिक्रमणामुळे रहदारी दरम्यान एखाद वाहनाचा धक्का लागून वाद निर्माण होऊन मोठा तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बाजूस आपल्या हद्दित करण्यात आलेले अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.