किनगाव जट्टू परिसरात या आठवड्यामध्ये दररोज कमी-अधिक पाऊस सुरू आहे़ शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने सुरेश राऊत यांचे मातीचे घर असल्याने जमीनदोस्त झाले़ घरातील साहित्याचे नुकसान झाले असून, टिन पत्रे भिंती जमिनीवर कोसळले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही़ संबंधितांनी स्थळ पाहणी करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
संततधार पावसामुळे घर जमीनदाेस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST