खामगाव : संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात २६ जून रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान मेघगर्जनेसह सर्वदुर पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील नाले ओसांडून वाहत होते. तर चांगेफळ फाट्याजवळील नदीला पुर आल्यामुळे काहीवेळ या नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे संग्रामपूर-जळगाव जामोद रस्त्यावरील वाहतूक काहीवेळ बंद झाली होती.जळगाव जामोद तालुक्यात रविवारी रात्री व सोमवारी सकाळी दमदार पाऊस झाला. तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला. बेंबळा नदीच्या पुलावर उभा असलेला वसंत रमेश बोबडे हा युवक पुलावर अचानक पाणी वाढल्याने नदीत वाहून गेला. जळगाव जामोदचे तहसीलदार अनिल हेलकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी युवकाचा शोध सुरु केला. चांगेफळ व त्यानंतर चोंडी या परिसरात युवकाचा शोध घेण्यात आला. मात्र उशिरापर्यंत वसंत बोबडे या युवकाचा पत्ता लागला नाही.
जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात दमदार पाऊस
By admin | Updated: June 28, 2016 01:26 IST