शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

काँंग्रेसच्या केंद्रीय सचिवपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती

By admin | Updated: April 27, 2017 01:52 IST

बुलडाणा : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिवपदी बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बुलडाणा : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिवपदी बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे सरचिटणिस जनार्दन व्दिवेदी यांनी बुधवारी दिल्ली येथे ही नियुक्ती घोषित केली. आ. हर्षवर्धन सपकाळ हे यापूर्वी राजीव गांधी पंचायत राज संघटन या कॉंग्रेसच्या सलंग्नित संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणिस व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या गुजरात प्रभारी चमूमध्ये स्थान देतानाच आ. हर्षवर्धन सपकाळ यांची सचिव म्हणून निवड झाली आहे. त्यांच्यासोबतच खा. राजीव सातव व आ. वर्षा गायकवाड यांचासुद्धा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.गेल्या सहा वर्षांपासून आ. हर्षवर्धन सपकाळ हे राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचेसुद्धा ते सदस्य आहेत. यापूर्वी त्यांनी युवक कॉंग्रेस व एन.एस.यू.आय. या युवकांच्या संबंधित दोन संघटनांचे प्रभारी म्हणूनसुद्धा कार्य केलेले आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांचा पंचायत राज व्यवस्थेतील अनुभव व अभ्यास लक्षात घेता गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांच्यावर राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. या संघटनेनंतर आता त्यांना अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती देण्यात आली आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचा स्क्रिनिंग कमिटीमध्ये समावेश करण्यात आला होता. सोबतच पंजाब विधानसभा निवडणुकीत केंद्रीय स्तरावरून स्थापित करण्यात आलेल्या कोअर कमिटीचेसुद्धा ते सदस्य होते. आ. हर्षवर्धन सपकाळ हे कॉंग्रेस विधिमंडळ पातळीवरसुद्धा अभ्यासू व आक्रमक आमदार म्हणून परिचित झाले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.