शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

'लेक लाडकी' योजनेत हयगय खपवून घेतली जाणार नाही- जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By दिनेश पठाडे | Updated: July 4, 2024 18:56 IST

जबाबदारीनुसार कामे करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश

दिनेश पठाडे, बुलढाणा: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. अर्जासाठी दिरंगाई, पैशाची मागणी, अडवणूक करणे, शिवाय इतर  कामात हयगय केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, सेतू केंद्रावर अर्ज करण्यासाठी अतिरिक्त पैशाची मागणी करणाऱ्या केंद्रावर कारवाई होईल तसेच अर्ज करुन देण्याच्या कारणांने दलालाकडून पैशाची मागणी होत असल्यास त्यांच्यावरही सक्त कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.

योजनेच्या अनुषंगाने ३ जुलै रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात ४ जुलैला पत्रकार परिषदेत घेण्यात आली. यावेळी डॉ. किरण पाटील यांनी, योजनेच्या निकषात झालेल्या बदलाची सविस्तर माहिती दिली. ज्यांच्याकडे वय अधिवास प्रमाणपत्र नाही, अशा महिलांना १ जुलै २००९ पूर्वीच रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाईल. तसेच पिवळे व केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्राच्या दाखल्याची आवश्यकता नसेल. जिल्ह्यात जवळपास ६ ते ७ महिलांना या योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. महिलांना उत्पन्न, वय अधिवास प्रमाणपत्र काढून देण्यासाठी तलाठी, तहसील प्रशासनास आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कामात कोणीही हयगय केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले. अर्ज करताना महिलांनी आधार लिंक बँक खाते प्राधान्याने द्यावे, ही प्रक्रिया सुकर करण्यात आल्याने महिलांनी शांततेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले. यावेळी महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद येंडोले आदी उपस्थित होते.

---ऑनलाइनसाठी अडचण; अंगणवाडी सेविकांकडे करा अर्जयोजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नारीशक्ती या ॲपवर देखील अर्ज करता येणार आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून अर्ज करताना अडचण येत असल्यास गावच्या अंगणवाडी सेविकांकडे देखील ऑफलाइन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही,असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

--जिल्हास्तरीय समिती लाभार्थी यादी करणार अंतिम

लाभार्थ्यांच्या निवडीसाठी तालुका आणि जिल्हास्तरावर समिती असणार आहे. जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री असणार आहेत. ही समिती लाभार्थी यादी अंतिम करणार आहे. त्याशिवाय इतर दोन सदस्य अशासकीय असतील. पालकमंत्र्यांच्या सहमतीने ही समिती गठीत केली जाणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा