शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

औषध फवारणीच्या दक्षतेविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST

फवारणी करताना गळके फवारणी यंत्र वापरू नये. फवारणीच्या वेळी संरक्षक कपडे, हातमौजे, मास्क यांचा वापर करावा. तणनाशक व कीटकनाशक ...

फवारणी करताना गळके फवारणी यंत्र वापरू नये. फवारणीच्या वेळी संरक्षक कपडे, हातमौजे, मास्क यांचा वापर करावा. तणनाशक व कीटकनाशक फवारणीसाठी वेगवेगळ्या पंपाचा वापर करावा. कीटकनाशके ही लहान मुले, खाद्यपदार्थ तसेच गुरांपासून दूर ठेवावे. हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये तसेच फवारणी करताना धूम्रपान वगैरे करू नये. फवारणीचे मिश्रण काठीच्या साहाय्याने करावे. कीटकनाशकांच्या बाटल्या वापरानंतर जमिनीत गाडून नष्ट कराव्यात. फवारणी झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ करून कपडे स्वच्छ धुवावेत इत्यादी गोष्टींचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर विषबाधेची लक्षणे जसे की, चक्कर येणे, घाम येणे, उलटी, मळमळ, डोके दुखणे, पोट दुखणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे जाणवल्यानंतर करावयाच्या उपाययोजना वा प्रथमोपचारही सांगितले. यावेळी अंकुश मेहेत्रे व इतर शेतकरी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे समन्वयक मोहजीतसिंग राजपूत आणि कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. विलास चव्हाण व प्रा. मंगेश धांडे यांचे मार्गदर्शन लाभले.