शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या सहय़ा करून अनुदान लाटले

By admin | Updated: April 15, 2015 00:49 IST

मेहकर येथील वसतिगृहाचा कारभार चव्हाट्यावर.

मेहकर (जि. बुलडाणा ) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींच्या गृहपालाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खोट्या सहय़ा करून तसेच विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणार्‍या अनुदानाचा गैरवापर करून लाखो रुपये हडपल्याचे वास्तव समोर आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाला १३ एप्रिल रोजी आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी भेट देऊन पाहणी केली असता, वसतिगृहाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही. अंघोळीसाठी जे पाणी वापरण्यात येते तेच मुलींना पिण्यासाठी देण्यात येते. पाण्याच्या एकाही टाकीवर झाकण नाही. घाणयुक्त पाणी आहे. पाण्याचा प्रत्यक्षात तुटवडा असतानाही रेकॉर्डवर मात्र दररोज दोन टँकर दाखवल्या जातात. मुलींना शासनाकडून येणारे कोणतेही साहित्य व गणवेश देण्यात आले नाहीत. विद्यार्थ्यांना खिचडी देऊ नये, असा सक्त आदेश असतानाही आठवड्यातील दोन वेळा विद्यार्थ्यांना खिचडीच देण्यात येते. मांसाहारी जेवणसुद्धा देण्यात येत नाही. वसतिगृहामध्ये विद्यार्थिनींची संख्या कमी असल्यास रेकॉर्डवर जाणीवपूर्वक जास्त विद्यार्थिनी दाखवून अनुदान हडपल्या जाते. शासनाकडून मिळणार्‍या सुविधा मुलींपर्यंंत पोहचतच नाहीत. गृहपालाची तक्रार केल्यास त्या विद्यार्थिनींवर दबाव आणून त्यांना धमकावण्यात येते. शासनाच्या नियमाचे या वसतिगृहामध्ये उल्लंघन होत असून, विद्यार्थिनींचे हाल होत असल्याचे वास्तव आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी वसतिगृहाची पाहणी केली असता समोर आले आहे. तसेच तालुक्या तील खंडाळा देवी येथील मुलांच्या वसतिगृहामध्येसुद्धा अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी तर विद्यार्थ्यांच्या खोट्या सहय़ा करून विविध योजनांचे अनुदान हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणीसुद्धा पाण्याची दयनीय अवस् था आहे. पाण्याचा अभाव असल्यामुळे मुलांना ४ ते ५ दिवस अंघोळीविना राहावे लागत आहे. गृहपालाचे कोणतेच नियंत्रण वसतिगृहावर नसून, शासनाकडून येणारे लाखो रुपये अनुदान लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचे आ. रायमुलकर यांनी उघडकीस आणले आहे. तरी तत्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी सामाजिक न्यायमंत्री व जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली आहे. तसेच सदर प्रकरण विधानसभेत मांडणार असल्याचेही सांगितले. दरम्यान, मेहकर येथील वसतिगृहाच्या गृहपाल रजनी वैद्य यांनी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांंना सर्व सुविधा पुरविल्या जा तात. मध्यंतरी बँका बंद असल्याने थोडी असुविधा झाली होती. शासनाकडून येणार्‍या सर्व सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांंना देण्यात येत असल्याचे सांगीतले.