शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने बाजारातील लुडबुड थांबवावी - घनवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:27 IST

शासनाने देशातील शेतमालाच्या बाजारपेठेत लुडबुड करू नये, जेणेकरून शेतकर्‍याला कर्जमाफीची गरज भासणार  नाही, असे स्पष्ट करीत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष अनिल घनवट यांनी चिखली येथे आयोजित पत्नकार परिषदेत १३ नोव्हेंबर रोजी केली.

ठळक मुद्देउणे अनुदानाच्या स्वरुपात शेतकर्‍यांचे कोट्यवधी शासनाकडे थकीत

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : देशात मुक्त अर्थव्यवस्था असताना शासन बाजारात लुडबुड करून देशातील शेतमालाचे भाव पाडण्याचे पाप करीत आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतमालाचे भाव कोसळल्याने शेतकर्‍यांच्या शेतीमधून उत्पादन खर्चसुद्धा निघणे कठीण झाले असून, शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. त्यामुळे शासनाने देशातील शेतमालाच्या बाजारपेठेत लुडबुड करू नये, जेणेकरून शेतकर्‍याला कर्जमाफीची गरज भासणार  नाही, असे स्पष्ट करीत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष अनिल घनवट यांनी चिखली येथे आयोजित पत्नकार परिषदेत १३ नोव्हेंबर रोजी केली.शेतकरी नेते शरद जोशी यांच्या दुसर्‍या पुण्यतिथीनिमित्त शेगाव येथे १२ डिसेंबर रोजी शेतकरी संघटनेच्या  वतीने राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल चव्हाण, युवा आघाडीचे प्रांत अध्यक्ष सतीश दानी, महिला आघाडीच्या प्रदेशध्यक्ष गीता खांडेभराड, पश्‍चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्ष सीमा नरोडे, एकनाथराव पाटील, वामनराव जाधव, देवीदास कणखर, समाधान कणखर, मुरलीधर येवले, राजू शेटे अच्युतराव पाटील यांच्यासह अन्य प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलताना घनवट म्हणाले की, शासन शेतकर्‍यांना कर्जमाफी देत असल्याचे भासवून शेतकर्‍यांवर उपकार केल्याची भावना निर्माण करीत आहे; मात्न उणे अनुदानाच्या स्वरूपात शेतकर्‍याचे लाखो कोटी रूपये शासनाकडे थकीत आहे. सोबतच घनवट म्हणाले की,  योग्य दाबाचा आणि अखंडित वीज पुरवठा करण्याची जबाबदारी वीज कंपनीची आहे.  शेतकरी वीज वितरण कंपनीचे वीज बिल देणे लागत नाही. कारण वीज वितरण कंपनीला शासनाने शेतकर्‍यांकडून गोळा करून १0 हजार कोटी रुपये दिले आहे. शेतकर्‍यांच्या बिलाची बेरीज केली तरी १0 हजार कोटी रुपये होत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी वीज वितरण कंपनीचे काहीही देणे लागत नाही. वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांची वीज तोडण्याची हिम्मत करू नये, अन्यथा त्याला शेतकरी संघटना आपल्या पद्धतीने उत्तर देण्यास सर्मथ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच शासनाने शेतकर्‍यांना योग्य बाजार भाव द्यावा न देता आल्यास व्यापार्‍यांनी खरेदी केलेल्या मालाचा भाव आणि हमी भाव यामधील  फरकाची रक्कम शासनाने शेतकर्‍याला द्यावी, त्यासाठी आधारभूत किमतीवर खरेदी केंद्र सुरू करून त्यामधून शेतकर्‍यांची छळवणूक करू नये, कारण ही केंद्रे चालवण्यासाठी शासनाकडे योग्य अशी यंत्नणा नाही. त्यामुळे या खरेदी यंत्नणेचा गोंधळ उडाला आहे. याच्याकडे जागा नाही, बारदाना नाही. कामगाराचा असहकार त्यामुळे ही केंद्रे सुरू करण्याऐवजी शेतमाल खुल्या बाजारात विक्री करून शेतकर्‍याला फरकाची रक्कम द्यावी. दरम्यान,      शेतकरी सक्षम करण्याची शासनाची इच्छा नसल्याची टीका करून ते म्हणाले की, केंद्र सरकारने तेलवाण आणि डाळीचे भाव वाढताच मोठय़ा प्रमाणात प्रदेशातून हे वाण आयात करून शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडले. कडधान्य मोठय़ा प्रमाणात आयात केल्याने भविष्यात या वाणाचे भाव वाढण्याचे कोणतेच चिन्ह नाही. त्यामुळे या सरकारला शेतकर्‍यांपेक्षा ग्राहकाची जास्त काळजी आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला, तर शेगाव येथील मेळाव्याला २५ ते ३0 हजार शेतकरी उपस्थित राहतील, असा दावादेखील घनवट यांनी यावेळी केला.

टॅग्स :agricultureशेती