शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय धान्याची अफरातफर

By admin | Updated: November 13, 2014 00:32 IST

लोणार तालुक्यातील ४६ क्विंटल धान्याची परजिल्ह्यात परस्पर विक्री.

लोणार (बुलडाणा): गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य मिळण्यासाठी शासनाने स्वस्त धान्य वितरण प्रणाली कार्यान्वित केली; मात्र या योजनेंतर्गत वाटपासाठी येणारे स्वस्त धान्य खर्‍या लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता त्याची जादा दराने काळ्या बाजारात विक्री सुरु आहे. याकडे पुरवठा विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होते आहे. तालुक्यातील गारपीटग्रस्त गाव असलेले पहुर येथील स्वस्त धान्य दुकानदार याने नोव्हेंबर महिन्यातील वाटपासाठी उचललेले ४६ क्विंटल धान्याची परजिल्ह्यात परस्पर विक्री केल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली.या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी.भराडी यांच्या पथकाने पहून येथे जाऊन चौकशी केली असता शासकीय धान्याची अफरातफर केल्याचे आढळून आले. गावातील नागरिकांना स्वस्त दरात गहू, तांदूळ आणि साखरेचे वाटप होण्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी येथील शासकीय गोदामातून पहूर येथील स्वस्त धान्य दुकानदार आर.एस.मुंढे याने २६ क्विंटल गहू, १८ क्विंटल तांदूळ, २ क्विंटल साखर असे एकूण ४६ क्विंटल स्वस्त धान्य एम.एच.0४ एजी ८४ क्रमांकाच्या ४0७ वाहनात गावात वाटपासाठी भरुन नेले. धान्य गावात न नेता त्याची वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात जादा दराने परस्पर विक्री केली.शासकीय धान्याची केलेल्या अफरातफरीवरुन सदर दुकानदाराचा परवाना रद्द करुन त्याविरुद्ध अन्न पुरवठा जीवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी भराडी यांनी सांगितले.