शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख वृक्ष लागवडीची गुरुदक्षिणा!

By admin | Updated: July 20, 2016 00:28 IST

चिखली येथील रौप्य महोत्सवी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त स्वामी हरिचैतन्य महाराजांना एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प सोडून गुरुदक्षिणा दिली.

चिखली (जि. बुलडाणा): गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस. यानिमित्ताने तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील गुरुदेव आङ्म्रमात रौप्य महोत्सवी गुरुपौर्णिमा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळय़ात १ लाख वृक्षांची लागवड व त्यांच्या संगोपनाचा संकल्प करणार्‍या स्वामीभक्तांनी स्वामी हरिचैतन्य महाराजांना एक आगळीवेगळी गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त केली. तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील स्वामी हरिचैतन्य महाराजांच्या गुरुदेव आङ्म्रमात दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठय़ा उत्साहात व हजारोंच्या उपस्थितीत साजरा केल्या जातो. यंदा येथील गुरुपौर्णिमा उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. त्यानुसार हा सोहळा संस्मरणीय ठरावा, सोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यात आङ्म्रमाचे भरीव योगदान राहावे, यानुषंगाने स्वामीभक्तांनी यावेळी १ लाख वृक्ष लागवडीची गुरुदक्षिणा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १९ जुलै रोजी गुरुदेव आङ्म्रमात आयोजित रोप्य महोत्सवी गुरुपौर्णिमा उत्सवात हजारो भक्तांनी हा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना हरिचैतन्य महाराजांनी वृक्ष लागवडीसोबतच त्या वृक्षाची जोपासना करणे गरजेचे असून, नुसते रोप लावून भागणार नाही तर त्या रोपट्याचे मोठय़ा वृक्षात रूपांतर होण्यापर्यंत त्याचे संगोपन प्रत्येकाने करावे व एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वास न्यावा, असे आवाहन केले. या सोहळय़ास उपस्थित तहसीलदार विजय लोखंडे, गविअ राजपूत, अरविंदबापू देशमुख, डॉ.गणेशराव कोल्हे, रवींद्र डाळींमकर, राजू पाटील, हरियाक्ष महाराज, डॉ.भास्करराव पालवे आदी मान्यवरांच्याहस्ते आङ्म्रम परिसरात १0१ वृक्षांची लागवड करून वृक्ष लागवड व संगोपनाच्या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. दरम्यान, आङ्म्रमात पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात स्वामींना गुरुस्थानी मानणार्‍या हजारो अनुयायांनी त्यांचे दर्शन व पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. यापश्‍चात हरिचैतन्य महाराजांचे प्रवचन पार पाडले. या सोहळय़ाला महिला व पुरूषांची मोठी उपस्थिती होती.