शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’मुळे गणेशोत्सवाचे बजेट कोलमडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:07 IST

बुलडाणा :  २५ दिवसांवर गणेशोत्सव आल्याने गणेश मंडळांकडून गणपती आगमनाची तयारी सुरू झाली आहे;   मात्र यंदा वस्तू आणि सेवाकराचा (जीएसटी) फटका गणेशोत्सव मंडळांच्या खर्चाला बसणार आहे.

ठळक मुद्देगणेश मूर्तीसह देखाव्यांनाही फटका देखाव्यासाठी गणेश मंडळाचा हात आखडताच

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  २५ दिवसांवर गणेशोत्सव आल्याने गणेश मंडळांकडून गणपती आगमनाची तयारी सुरू झाली आहे;   मात्र यंदा वस्तू आणि सेवाकराचा (जीएसटी) फटका गणेशोत्सव मंडळांच्या खर्चाला बसणार आहे. बॅनर, मांडव उभारणी व देखाव्यासाठी लागणार्‍या विविध वस्तूंवर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाची कर आकारणी जवळपास दुप्पट वाढली आहे. कच्चा मालाचे भाव वाढल्याने देखाव्याबरोबरच गणेश मूर्तीचेही भाव वाढले आहेत. विघ्नहर्ता o्री गणेशाची २५ ऑगस्ट रोजी स्थापना होणार आहे. मोठ-मोठे सार्वजनिक गणेश मंडळ o्री गणेशाच्या आगमनाच्या   तयारीला लागले आहेत.  जिल्ह्यात ८७४ सार्वजनिक गणेश मंडळ असून, शहरी भागात ३३७ तर ग्रामीण भागात ५३७ गणेश मंडळांचा समावेश आहे; परंतु शासनाने १ जुलैपासून देशात लागू केलेल्या वस्तू आणि सेवाकराचा म्हणजे जीएसटीचा सार्वजनिक गणेश मंडळावर बोजा पडणार आहे. उत्सवादरम्यान विविध वस्तूंच्या दरामध्ये कमी-जास्त प्रमाणात वाढ झाल्याचे दरवर्षी जाणवते; परंतु यावर्षी मांडव, सजावट खर्च, साऊंड सिस्टिम तसेच बॅनर छपाईसाठी सार्वजनिक गणेश मंडळांना जादा पैसे मोजावे लागणार आहे. गेल्यावर्षी अहवाल छपाईसाठी सहा टक्के कर द्यावा लागत होता,  तर मांडव व साऊंड सिस्टिमसाठी १५ टक्के कर द्यावा लागत होता; परंतु यावर्षी जीएसटीमुळे छपाई, विद्युत, साऊंड सिस्टिम व मांडव यासाठी १८ टक्के जीएसटी लावला आहे. परिणामी, गणेशोत्सवाच्या देखाव्यांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. देखाव्यांसह मूर्तींंच्या किमतींनाही जीएसटीचा फटका बसला आहे. यावर्षी जीएसटीमुळे प्लास्टरचे दर १६0 रुपयांवरून २२0 रुपये झाले आहेत. त्यातच कच्चा मालाच्या टंचाईमुळे पारंपरिक गणेश मूर्ती करताना  मूर्तिकारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदा जीएसटीचा मोठा परिणाम गणेशोत्सवावर दिसून येत असून, कच्चा मालाच्या किमती वाढल्याने मूर्तींंच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गणेश मंडळांचे बजेटही वाढणार आहे.