धामगणाव धाड : येथील शेतकरी गजानन सखाराम देवकर यांच्या शेतातील गोठय़ाला काल १९ मेच्या सकाळी ११.३0 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे गोठय़ातील शेती उपयोगी साहित्य व शेतमाल जळून त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. गावशिवारातील शेतात देवकर यांनी गुराढोरांसाठी गोठा बांधला होता. त्यामध्ये शेती उपयोगी साहित्य तसेच गुरांचे वैरण, पी.व्ही.सी पाईप, फायबरचे टोपले व इतर साहित्य ठेवले होते. काल सकाळी ११.३0 वाजेच्या सुमारास या गोठय़ाला अचानक आग लागली. यात गोठा संपुर्ण जळून खाक झाला. तर टिनपत्रे पुर्णपणे वाकली. याप्रकरणी गावचे तलाठी यांनी नागरिकांच्या उपस्थितीत पंचनामा केला. या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
गोठय़ाला आग; हजारोचे नुकसान
By admin | Updated: May 20, 2014 23:53 IST