शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा काढण्यासाठी बँकेसमोर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:58 IST

सिंदखेडराजा: राष्ट्रीय पीक योजनेंतर्गत शेतकºयांना दोन वर्ष पडलेल्या दुष्काळामुळे चांगला फायदा मिळाला होता. त्यामुळे यावर्षीसुद्धा दुष्काळाचे सावट दिसत असल्यामुळे व विमा भरण्यासाठी कमी कालावधी उरल्यामुळे बँकेसमोर ३० जुलैला शेतकºयांच्या रांगा लागल्या होत्या

ठळक मुद्देयावर्षीसुद्धा दुष्काळाचे सावट विमा भरण्यासाठी उरला कमी कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: राष्ट्रीय पीक योजनेंतर्गत शेतकºयांना दोन वर्ष पडलेल्या दुष्काळामुळे चांगला फायदा मिळाला होता. त्यामुळे यावर्षीसुद्धा दुष्काळाचे सावट दिसत असल्यामुळे व विमा भरण्यासाठी कमी कालावधी उरल्यामुळे बँकेसमोर ३० जुलैला शेतकºयांच्या रांगा लागल्या होत्या. शासनाच्या आदेशान्वरे सुटीचा दिवस असूनही सर्वच राष्ट्रीयीकृत बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकºयांची गर्दी वाढली होती.राष्ट्रीय पीक विमा काढण्यासाठी शासनाने सीएससी केंद्रावर आॅनलाइन विमा भरण्यासाठी २१ जुलै रोजी मान्यता दिली होती; परंतु एका केंद्रावर एका दिवसात २० ते २५ शेतकºयांचा विमा भरण्यात आला. तेथेसुद्धा शेतकºयांची प्रचंड गर्दी झाली होती. २८ जुलै रोजी सदर सेंटरवर विमा भरणे बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला व २९ जुलैपासून राष्ट्रीयीकृत बँकेसह जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेतसुद्धा विमा भरण्याचे आदेश मिळताच बँकेसमोर शेतकºयांच्या रांगा लागल्या होत्या. विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. त्यामुळे रविवारीसुद्धा विमा भरण्यासाठी बँक उघडी होती, असे बँक व्यवस्थापक रवींद्र चौरपगारे व ई.एस. पवार यांनी सांगितले.अंढेरा येथे तलाठ्याची गैरहजेरीअंढेरा: देऊळगावराजा तालुक्यातील महत्त्वाचे समजल्या जाणाºया अंढेरा येथे तलाठ्याच्या गैरहजेरीमुळे शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ३० जुलै रोजी तलाठी कार्यालयावर पीक विमा भरण्यासाठी लागणारे ७/१२, ८ अ, पीक पेरा दाखला घेण्यासाठी शेतकºयांनी तलाठी कार्यालयाला बेशरमीचा हार घालून तलाठ्यांचा निषेध व्यक्त केला. पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०१७ असल्याने जिल्हाधिकाºयांनी तलाठ्यांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले असून, ३० जुलै (रविवार) ला राष्टÑीयीकृत बँकासुद्धा पीक विमा रक्कम भरण्यासाठी सुरू आहेत; परंतु येथील तलाठी लोखंडे यांनी गेल्या २ दिवसांपासून कार्यालयाकडे पाठ फिरवली आहे. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे येथील शेतकरी सुभाष डोईफोडे यांनी तहसीलदार बाजड, मंडळ अधिकारी टाके यांना फोन करून तलाठी गैरहजर असल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकºयांना पीक विमा भरण्यासाठी लागणारे दाखले मिळण्यासाठी तत्काळ दखल घेत तहसीलदार बाजड व टाके यांनी अनिकेत नारखडे यांना अंढेरा येथे पाठविले. थोड्याच दिवसांपूर्वी अंढेरा येथील भाग १ चे तलाठी यांचा पदभार तहसीलदार बाजड यांनी काढून कामचुकार तलाठ्यावर कार्यवाही केली होती. याकडे लक्ष देण्याची मागणी सुभाष डोईफोडे, सुभाष गाडे, विठ्ठल देशमुख, राजू तेजनकर, रामप्रसाद देशमुख, वामन सानप, दामू सानप, सुनील दंडे, किशोर सानप यांनी केली आहे.