शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा, होऊ शकतो कॅन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST

हे आहेत परिणाम एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यावर ॲसिडिटी तसेच हृदयासंबंधित आजार, अल्जायमर, पार्किंसन्सचे आजार आणि घशाची जळजळ यांसारख्या ...

हे आहेत परिणाम

एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यावर ॲसिडिटी तसेच हृदयासंबंधित आजार, अल्जायमर, पार्किंसन्सचे आजार आणि घशाची जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

रस्त्यावर न खाणे बरे

डीप फ्रायसाठी एकदा वापरलेले तेल खरे तर पुन्हा वापरू नये. पण काही पदार्थात आपण ते वापरू शकतो. परंतु हा वापर ते तेल कोणत्या प्रकारचे आहे, ते डीप फ्रायसाठी वापरले आहे की, हलक्या तळणासाठी वापरले आहे आणि ते तेल आता कोणत्या पदार्थात वापरले जाणार आहे, यावर अवलंबून आहे. तेव्हा रस्त्यावरील पदार्थ न खाल्लेलेच बरे असा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत.

तळीव पदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारे तेल वारंवार वापरल्यानंतर ते जड होते. आणि तेच पदार्थ खाल्ले तर शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते. स्थूलता येऊन पुढे जाऊन ते अनेक आजारांना निमंत्रण देते. तेव्हा असे तळलेले पदार्थ न खाल्लेलेच बरे.

-डॉ. वैशाली पडघान, आयुर्वेदाचार्य व आहारतज्ज्ञ.

...तर होईल गुन्हा दालख

अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खाद्यतेल कोणताही पदार्थ तळण्यासाठी दोन ते तीन वेळा वापरणे योग्य आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त वेळा वापरणे चुकीचे आहे. वारंवार वापरलेल्या तेलामध्ये टोटल पोलर कम्पाऊंडचे रीडिंग २५ पेक्षा जास्त आल्यास अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून खटला दाखल केला जाऊ शकतो. तेव्हा वारंवार तेल न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तपासणी मोहीम सुरू

जिल्ह्यातील ३० ते ४० स्वीट मार्ट चालक आणि फरसाण विक्रेत्यांची अन्न व औषध विभागाच्यावतीने तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये कोणाकडेच वारंवार तेलाचा वापर केल्याचे आढळून आले नाही. पुढेही ही मोहीम सुरू राहणार असून, यामध्ये काही अनुचित प्रकार आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध विभागाचेे सहाय्यक आयुक्त एस. डी. केदारे यांनी दिली.