शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार प्रकल्प ओव्हरफ्लाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST

बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून हाेत असलेल्या जाेरदार पावसामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात माेठी वाढ झाली आहे़ चार प्रकल्प ओव्हरफ्लाे ...

बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून हाेत असलेल्या जाेरदार पावसामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात माेठी वाढ झाली आहे़ चार प्रकल्प ओव्हरफ्लाे झाले आहेत़ या प्रकल्पांमधून नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहेत़ खडकपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ हाेत असल्याने ९ वक्रदारातून ३० सेमीने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे़

ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यात दमदार पाऊस हाेत आहे़ त्यामुळे, जलसाठ्यात वाढ हाेत असून अनेक प्रकल्प ओव्हरफ्लाे झाले आहेत़ सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत प्रकल्पक्षेत्रात जाेरदार पाऊस झाल्याने ज्ञानगंगा, काेराडी, उतावळी प्रकल्प ओव्हरफ्लाे झाले आहेत़ तसेच नळगंगामध्ये ६३़ २३ टक्के, पेनटाकळीमध्ये ६०़ ६० टक्के आणि खडकपूर्णा प्रकल्पात ८९़ ७३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे़ सप्टेंबर महिन्यापर्यंत २० टक्क्यावर असलेल्या पलढग प्रकल्पाच्या जलसाठ्यातही माेठी वाढ झाली असून ६३़ ५२ टक्क्यांपर्यंत जलसाठा वाढला आहे़ मस प्रकल्पात ६२़ ०३ टक्के,मन प्रकल्पात ९८.७५ टक्के, ताेरणा प्रकल्पात ८५.६८ टक्के जलसाठा आहे़ दमदार पावसामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला आहे़

मध्यम, लघु प्रकल्पही तुडुंब

जिल्ह्यात एकूण ७ मध्यम व ८१ लघु प्रकल्प आहेत़ या प्रकल्पांमध्येही माेठ्या प्रमाणात जलसाठा वाढला आहे़ मध्यम प्रकल्पामध्ये सरासरी ९२.६२ टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये ६४.६१ टक्के जलसाठा आहे़ जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये आतापर्यंत ७५.५२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे़

काेराडी, उतावळीतून पाण्याचा विसर्ग

मेहकर तालुक्यातील काेराडी प्रकल्प ओव्हरफ्लाे झाला असून २० सेमीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ तसेच उतावळी प्रकल्पही भरला असून ३ सेमीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ प्रकल्पांच्या क्षेत्रात दमदार पाऊस हाेत असल्याने जलसाठ्यात आणखी वाढ हाेणार आहे़ यावर्षी प्रकल्प भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे़

पद्मावती धरण ओव्हरफ्लाे, ३२ गावांना दिलासा

बुलडाणा तालुक्यातील धामणगावसह परिसरात गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील नदी, ओढे, तुडुंब भरले आहे़ त्यामुळे पदमावती धरण ओव्हरफ्लाे झाले असून परिसरातील ३२ गावांचा पिण्याचे पाणी तसेच खरीपासह रब्बी हंगामातील पिकांना मोठा फायदा हाेणार आहे़ हे मराठवाडा व विदर्भाच्या असलेल्या या धरणाचा वालसावंगीसह, पारध, धामणगाव , वाढोणा , मासरूळ, डोमरूळ, जनुना , गुम्मी , तराडखेड आदी गावांना दिलासा मिळणार आहे़