शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी, ६९० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:35 IST

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ९५, दहीद ४, गोंधनखेड २, पाडळी २, धाड ८, अंबोडा २, गिरडा ३, शिरपूर २, ...

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ९५, दहीद ४, गोंधनखेड २, पाडळी २, धाड ८, अंबोडा २, गिरडा ३, शिरपूर २, चिखली ५७, टाकरखेड हेलगा २, उंद्री ४, भालगाव ३, सोमठाणा २, कोनड ३, खैरव २, इसरूळ २, किन्ही नाईक २, काटोडा ३, बोरगाव काकडे ३, शेलसूर २, खंडाळा ३, ढासाळवाडी ३, मलगी ९, नायगाव २, पांढरदेव २, दे. घुबे २, मेहकर १०, दौलत गव्हाण २, हिवरा आश्रम २, जानेफळ २, जळगाव जामोद ६, नांदुरा २७, महाळुंगी २, आलमपूर २, नारखेड २, वडनेर ९, टाकळी २, शेलगाव बाजार २, किन्होळा ६, पिं. देवी २, बोराखेडी ७, मोताळा २३, शेगाव ७४, जलंब २, खामगाव ५५, लाखनवाडा ६, पिंप्री देशमुख १, आवार २, चिंचपूर ७, आंबेटाकळी २, मलकापूर १९, नरवेल ३, लासुरा ६, कुंड बु. २०, लोणवडी ४, भोसा २, रताळी ६, साखरखेर्डा ४, वसंत नगर ७, सावखेड तेजन २, दे. राजा २५, दे. मही ३, सिनगाव जहा १०, लोणार ८, जळगाव जिल्ह्यातील हरणखेड येथील एक, अकोला जिल्ह्यातील कसुरा, माळेगाव, काजीखेड येथील प्रत्येकी एक जण कोरोना बाधितांचा यात समावेश आहे.

दरम्यान खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथील ६५ वर्षीय व्यक्ती, शेगाव तालुक्यातील लासुरा येथील ८५ वर्षीय व्यक्ती, चिखली शहरातील सुभाषनगरमधील ५८ वर्षीय व्यक्ती, मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील ८५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान बुधवारी ३०४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

--१,६७,२५८ जणांचे अहवाल निगेटिव्ह--

आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या १ लाख ६७ हजार २५८ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २२ हजार ६८३ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता २६ हजार ९२० झाली आहे. त्यापैकी ४०११ सक्रिय रुग्ण असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात २२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

--सरासरी चाचण्या वाढल्या--

जिल्ह्यात कोरोनाच्या सरासरी चाचण्या वाढल्या आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचेही प्रमाण वाढले आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसत असले तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १३ टक्क्यांवर स्थिरावला आहे. तो दहा टक्क्यांच्या खाली आणावयाचा आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या २२६ जणांमध्ये वयोवृद्धींची तथा दुर्धर आजार असणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे घरातील वृद्धांची सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.