शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत आढळले मृत बिबट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 19:46 IST

लोणार : तालुक्यातील टिटवी परिसरात ज्ञानेश्वर चिभडे यांच्या शेतातील विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्याची घटना १९ जुलै उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : जागतीक पर्यटन स्थळ लोणार सरोवर परिसरातील चंदनाच्या लाकडावरील मांसाहरी मेजवानीची घटना ताजी असतानाच तालुक्यातील टिटवी परिसरातील ज्ञानेश्वर चिभडे यांच्या शेतातील विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्याची घटना १९ जुलै उघडकीस आली.तालुक्यातील टिटवी परिसरात ज्ञानेश्वर चिभडे यांचे शेत आहे. काही दिवसांपासून परिसरात बिबट फिरत असल्याचे त्यांनी वनविभागाला कळविले होते. परंतु संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यादरम्यान शेतातील कुत्रा बिबट्याने खाल्ला. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ज्ञानेश्वर चिभडे यांनी तोंडी केली होती. मात्र कोणतीही कारवाई वनविभाग अधिकारी यांचेकडून झाली नाही. १९ जुलै रोजी शेतात गेले असता ज्ञानेश्वर चिभडे यांना विहिरीत बिबट मृत अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच आरएफओ पी.बी.सानप, वनपाल ए.पी.वरणकर, आर.बी. पवार, वनरक्षक सि.एन.लद्धड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जागतीक पर्यटन स्थळ लोणार सरोवर परिसरात चंदनाच्या झाडावर शिजवून रंगलेली मांसाहारी मेजवाणी गरम असतानाच टिटवी परिसरात विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. विहिरीत पडून मृत्यू झालेला बिबट्याला ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठविले जाणार आहे. शवविच्छेदनाच्या रिपोर्टवरुन मृत्यूचे कारण कळेल.- ए.पी.वरणकर, वनपाल, टिटवी.