तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक मतदान पळसखेड झाल्टा येथील वाॅर्ड क्रमांक १ मध्ये ९६.२१ तर सर्वात कमी मतदान पिंप्री आंधळे येथे वाॅर्ड क्रमांक ३ मध्ये ५४.५० टक्के झाले आहे. सोमवारी सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अविरोध झालेल्या तीन ग्रामपंचायतींंमध्ये पिंपळगाव बुद्रुक, नागनगाव आणि पाडळी शिंदे या गावांचा समावेश आहे. निवडणूक होऊ घातलेल्या २३ ग्रामपंचायतींमध्ये तालुक्यातील देऊळगाव ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून याठिकाणी होऊ घातलेली यावेळची निवडणूक मोठी प्रतिष्ठेची बनलेली आहे. याठिकाणी दोन पॅनल आमनेसामने उभे ठाकले आहेत. दोन्ही पॅनलचे नेतृत्व धुरंधर राजकारणी करत असल्याने ही निवडणूक रंगतदार व चुरस निर्माण करणारी होणार आहे. मतदान झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये गिरोली खुर्द, तुळजापूर, पळसखेड झाल्टा, निमगाव गुरू, पांगरी-वाडी, खल्याळ गव्हाण, देऊळगाव मही, डोढरा, टाकरखेड वायाळ, बायगाव बुद्रुक, मेंडगाव, पिंप्री आंधळे, सावखेड भोई, जवळखेड, उंबरखेड, चिंचोली बुरकुल, मेहुणा राजा, बोराखेडी बावरा, शिवणी आरमाळ, आळंद, अंढेरा, सावखेड नागरे, मंडपगाव यांचा समावेश आहे. २६ ग्रामपंचायतींमधून ६२ उमेदवार अविरोध निवडून आले आहेत.
४२२ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:30 IST