शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 17:20 IST

The five doors of the Khadakpurna Dam opened : पाच गेट १० सेमीने उघडण्या आले असून त्यातून १ हजार ८८२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

बुलडाणा: खडपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पाती जलसाठा ९१.०२ टक्के झाले आहे. त्यामुळे प्रकल्पाचे पाच गेट १० सेमीने उघडण्या आले असून त्यातून १ हजार ८८२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

१ सप्टेंबर रोजीही प्रकल्पाचे तीन गेट १० सेमीने उघडण्यात येऊन त्यातून १०९२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. दरम्यान खडकपूर्णा नदीच्या उमग क्षेत्रात तथा मराठवाड्यातील काही भागात, गौताळा अभयारण्य परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे खडकपुर्णा नदी दुधडी भरून वाहत होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसापूर्वी मृतसाठ्यात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाची पाणीपातळी ही झपाट्याने वाढली असून प्रकल्पामधील जलसाठा आजच्या घडीला ९१.०२ टक्के झाला आहे. त्यामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. चार दिवसात प्रकल्पामध्ये दहा टक्क्याने जलसाठा वाढला आहे.

 नदी काठड्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा पूर्वीच देण्यात आला आहे. बुलडाणा, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील ही गावे आहेत. यात बुलडाणा जिल्ह्यातील निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बुद्रूक, डिग्रस खुर्द, टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागिले, निमगाव वायाळ, साठेगाव, हिवरखेड, राहेरी खु., तडेगाव, राहेबी बुद्रूक, ताडशिवणी, देवखेड, पिंपळगाव कुडा, लिंगा, खापरखेडा, रायगाव, सावरगाव तेली या गावांचा समावेश आहे. दरम्यान जालना जिल्ह् ॉयातील किर्ला, दुधा, सासखेडा, लिंबखेडा, हनुमंत खेडा, उस्वद, टाकळखोपा, इंचा, कानडी, देवठाणा, वाघाळा सह परभणी जिल्ह्यातील वझर भामटे, सायखेड आमि हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील धानोरा या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :khadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागरbuldhanaबुलडाणा