शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पहिला दिवस कोराच!

By admin | Updated: October 25, 2016 03:00 IST

बुलडाणा जिल्ह्यातील आठ नगरपालिका निवडणुकीकरिता एकही अर्ज नाही.

बुलडाणा, दि. २४- जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीकरिता अर्ज भरण्याला २४ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाकरिता एकही अर्ज प्राप्त झाला नाही. जिल्ह्यात नऊ नगरपालिकांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दे.राजा, मेहकर, मलकापूर, बुलडाणा, चिखली, खामगाव, जळगाव जामोद, शेगाव व नांदुरा नगर परिषदांचा समावेश आहे. या नगरपालिकांसाठी अर्ज भरण्याचा सोमवार हा पहिला दिवस होता; मात्र पहिल्या दिवशी नगराध्यक्ष व नगरसेवकांकरिता एकही अर्ज आला नाही. मेहकर: नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार हे निवडणूक निर्णय अधिकारी तर मुख्याधिकारी सातपुते हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. २४ ऑक्टोबरपासून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे; मात्र आज पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. मेहकर नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून, नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. शहरामध्ये प्रत्येक वार्डात बैठका सुरू असून, भाजपाने नगरपालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी केली आहे. नगरपालिकेच्या २४ नगरसेवकांसाठी भाजपाकडे आतापर्यंत ६0 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असून, नगराध्यक्ष पदासाठी नऊ इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले, तर यावेळेस नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविणारच, असा ठाम विश्‍वास प्रल्हाद अण्णा लष्कर यांनी व्यक्त केला आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत मोहरील, भाजप नेते डॉ.सुभाष लोहिया, संजय लोहिया, डॉ.देवीदास माल, डॉ.भगवान झंवर, डॉ.आशिष अवस्थी, माधव बाजड, महिला नेत्या अर्चना पांडे, मंदाकिनी कंकाळ, भाजयुमोचे जिल्हा पदाधिकारी चंदन सहगल, किरण जोशी, राजेश निकमसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.