शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक विवंचनेत शेतक-यांची भाऊबीज!

By admin | Updated: October 25, 2014 23:50 IST

सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिके बुडालीत, कापूस अद्याप न आल्याने शेतक-यांची दिवाळी अंधारातच.

बुलडाणा : दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता सणाला विशेष महत्त्व राहिले नाही. रोजचीच दिवाळी आणि दसरा असे मोठे मन करून सर्वसामान्य माणूस सणासुदीला सामोरे जात आहे. सोयाबीनचा दाणा घरी नाही, कापसाचे आगमन झाले नाही, अशातच आलेल्या सणाला शेतकरी सामोरे गेले. या दिवाळीत शेतकर्‍यांना आनंद साजरा करता आला नाही. भाऊबीजेला घरी आलेल्या बहिणीची सरबराई करण्याचीही ऐपत शेतकरी भावाजवळ राहिली नाही. उशिरा आलेल्या पावसाने पेरण्या उशिरा झाल्या. त्यातच शेतकर्‍यांना नगदीचे उत्पन्न देणारे सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिके ऐन भरात असताना पावसाने उघाड दिल्याने कोमेजून उत् पन्नात प्रचंड घट झाली. परिणामी दिवाळी सणाला शेतकर्‍यांच्या हातात पैसा नसल्यामुळे यावर्षीची दिवाळी आर्थिक विवंचनेतच गेली. ग्रामीण भागात बहुतेक व्यवहार उधारीवर केले जातात. यामध्ये किराणा मालापासून तर कापड दुकानदाराचा समावेश असतो. खरिपातील पिकांची काढणी झाल्यानंतर त्यातून मिळणार्‍या उत्पन्नापासून दिवाळीपूर्वी जुनी उधारी चुकती करून नवीन व्यवहाराला सुरुवात केली जाते; मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकर्‍यावर सातत्याने अस्मानी व सुलतानी संकट ओढवल्या जात आहे. कधी नापिकी, तर कधी अतवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडी आलेला घास हिसकावल्या जात आहे. त्यामुळे दुकानदार व सावकाराची उधारी शेतकरी चुकता करू शकले नाही. यावर्षी बर्‍यापैकी सोयाबीनने साथ दिली होती; मात्र ऐन शेंगा भरण्याच्यावेळी पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे दाणे भरले नाही व झडती कमी झाली. त्यामुळे एकरी उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे.