शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणात उपवास महागला : शेंगदाणे, शाबुदाणा किलोमागे पाच रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST

दिवाळीपासून किराणा बाजारात फारशी तेजीमंदी झाली नसली तरी हळुवारपणे काही वस्तू, धान्य महागले आहे. आषाढीनंतर श्रावणात उपवासाच्या पदार्थांना मागणी ...

दिवाळीपासून किराणा बाजारात फारशी तेजीमंदी झाली नसली तरी हळुवारपणे काही वस्तू, धान्य महागले आहे. आषाढीनंतर श्रावणात उपवासाच्या पदार्थांना मागणी असते. मात्र, यंदा साबुदाणा, शेंगदाणे, भगर, राजगिऱ्याच्या दरात किलोमागे पाच रुपयांची तेजी झाली आहे. किराणा किरकोळ बाजारात एक महिन्यापूर्वी साबुदाण्याचे दर ५५ रुपये किलो होते. सध्या यात किलोमागे पाच रुपये वाढ झाली आहे. श्रावणात येथील बाजारात हजारो टन साबुदाण्याची आवक आणि विक्री होते. तर शेंगदाण्याचे दर ९० रुपये होते. सध्या १०० रुपये किलो भाव आहेत. तर ९०० रुपये किलो असणारी भगर यंदा स्थिर असून, तिचे भाव वाढलेले नाहीत. सध्या भगरीचे दर ९० रुपये किलोच आहेत.

आवक घटली, मागणी वाढली

शेंगदाणा : बुलडाणा जिल्ह्यातील काहीच भागात भुईमुगाचे पीक घेतले जातेे. सध्या बाजार समितीमध्ये भुईमूग खरेदी झाला आहे. मात्र, शेंगदाणे प्रक्रियेसाठी कारखान्याकडे गेला असून, याचा परिणाम आवकवर झाला आहे. एकीकडे आवक घटली तर दुसरीकडे उपवासामुळे या शेंगदाण्याची मागणी वाढली आहे. यामुळेच भावात वाढ झाली आहे.

शाबुदाणा : बाजारात येणारा शाबुदाणा राज्यातून कमी तर परराज्यातून अधिक मोठ्या प्रमाणात येतो. आता या शाबुदाण्याची आवक बुलडाणा बाजारात घटली आहे. तर आहे तो साठा ठोक विक्रेत्यांनी बाहेर काढला आहे. याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.

भगरीचे दर स्थिर

श्रावणमासाच्या आधीही आणि आताही भगरचे दर मात्र, स्थिर असल्याचे दिसून येत आहेत. भगर आधीही ९० रुपये किलोने विकली जात होती. तर आताही ९० रुपये किलोनेच विकली जात आहे. सध्या भगर जरी स्थिर असली तरी पुढील काळात मागणी वाढल्यास या भगरीचे दरही वाढू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मागणी दुप्पट वाढली

बाजारात उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे याच पदार्थांची आवक घटली आहे. याचा परिणाम दरावर झाला आहे. भाव दरवाढीवर झाला आहे. सध्या या पदार्थांची मागणी वाढल्याने महागाई जाणवत आहे.

-रमेश पाचपोर, किराणा व्यावसायिक.