शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्ज मुक्तीसाठी शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 20:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्तीच्या व विजबिलमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा गांधीभवन येथून निघून शहराच्या प्रमुख रस्त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.मोर्चामध्ये जिल्हाभरातून बहुसंख्य शेतकरी सामील झाले होते. तर महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चा दरम्यान ...

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा मोर्चात जिल्ह्यातील शेतक-यांसह महिलांचा लक्षणीय सहभागसंपूर्ण कर्जमुक्तीसह विजबिल माफ करण्याची प्रमुख मागणीजिल्हाधिका-यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्तीच्या व विजबिलमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा गांधीभवन येथून निघून शहराच्या प्रमुख रस्त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.मोर्चामध्ये जिल्हाभरातून बहुसंख्य शेतकरी सामील झाले होते. तर महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चा दरम्यान संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, विजबिल मुक्ती झालीच पाहिजे, स्वामिनाथन आयोग नको, शरद जोशी यांच्या कृषी कृती दलाचा अहवालाची अंमलबजावणी करा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतमालाची आयात निर्यात धोरणात बदल करा, शेतातील सरकारी हस्तक्षेप बंद करा, अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. त्यानंतर शेतकºयांच्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनामध्ये विशेषता शेतकरी कायम स्वरुपी कसा कर्जमुक्त होईल, याचा मसुदा मुख्यमंत्री व पंतप्रधानांना देण्यात आला. मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाल्यावर शेतकरी संघटनेचे डॉ.हासनराव देशमुख, नामदेवराव जाधव, सुरेश सोनुने, दामोधर शर्मा, कैलास गाढवे, समाधान कणखर यांनी मार्गदर्शन केले. तसेच दासा पाटील यांनी शेतकरी आंदोलनावर कविता सादर केली. यावेळी बोलताना नामदेवराव जाधव म्हणाले की, शासनाची कर्जमुक्ती फसवी असून शेतकºयांना संपूर्ण सरसगट कर्जमुक्ती हवी आहे. स्वामिनाथन आयोगापेक्षा शरद जोशीनी सादर केलेला कृषी दलाचा अहवाल लागू करण्यात यावा, जर सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तिव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या मोर्चात एकनाथ पाटील थुट्टे, सुरेशदादा सोनुने, सुभाष गिरी, ज्ञानेश्वर जाधव, कौतीक जामदार, तेजराव मुंदे, तेजराव मुंढे, मधुकर देठे, बद्रीनाथ बुधवत, गजानन जाधव, संतोष राजपूत, शिवप्रसाद सारडा, शरद सावजी, रमेशसिंग चव्हाण, कमळाजी पाटील, सुगदेवराव नरोटे, विजयकुमार डागा, नाजीम बेग, दिनककराव टेकाळे, श्रीराम पाटील, हरिदास खांडेभराड, प्रकाश अंभोरे, मुरली महाराज येवले, तनवीर देशमुख, शिवाजी सवडे, राजु भगत, शिवाजी उबरहंडे, डॉ.बाबुराव पाटील, विजय जाधव, सुखदेवराव नरोटे, नामदेवराव म्हळसने, रमेश पागोरे, काशीनाथ मेहेत्रे, सादीक देशमुख, राजु शेटे, नरहरी थुट्टे आदी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.