पंचायत समितीच्या सभागृहात २२ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सभापती सिंधू तायडे होत्या. सर्वप्रथम पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान तालुक्यातील विजय भुतेकर व इतर प्रगतशील शेतकरी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तसेच अनंता अंभोरे मंडळ कृषी अधिकारी मेरा यांनी सन २०२०-२१ मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा सुद्धा गौरव करण्यात आला. प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या सहकार शिक्षण व राजकीय कायार्बाबत माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेती केल्यास अधिक फायद्याची राहील असे मत व्यक्त केले. दरम्यान गटविकास अधिकारी हिवाळे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणानंतर प.स.सभातपी तायडे यांनी रक्षाबंधनाच्या औचित्याने उपस्थित सर्वांना राख्या बांधल्या. तसेच आमदार श्वेता महाले यांनी दिलेल्या राखी व रक्षाबंधनाचा संदेश उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. संचालन व आभार पं.स.कृषी अधिकारी संदीप सोनुने यांनी मानले. कार्यक्रमास तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कृषी विभागाव्दारे शेतकरी दिन साजरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST