शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

शेतीच्या वादातून हाणामारी

By admin | Updated: June 22, 2015 02:10 IST

मेहकर शिवारातील घटना; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल.

मेहकर (जि. बुलडाणा): : शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २0 जून रोजी सकाळी ११ वाजता मेहकर शिवारात घडली. येथील इंद्रजित विनय सावजी (२७) यांनी बुलडाणा बँकेच्या हर्रासीद्वारे मंदाकिनी भिमराव कंकाळ यांची शेती विकत घेतली. त्यानंतर नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून इंद्रजित सावजी यांनी सदर शेतीवर ताबा घेतला. दरम्यान, २0 जून रोजी शेतात पेरणी करण्यासाठी गेले असता त्यांना मंदाकिनी कंकाळ, अमोल कंकाळ, मुकुल कंकाळ, माधव दळवी यांच्यासह १0 ते १२ जणांनी लाठीकाठी व कुर्‍हाडीने मारहाण केली. इंद्रजित सावजी यांनी या प्रकरणात मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मंदाकिनी कंकाळ यांनीही परस्परविरोधी फिर्याद दिली. त्या शेतात जात असताना त्यांना रस्त्यात अडवून इंद्रजित सावजी, विनय सावजी तसेच १0 जणांनी मारहाण केली तसेच जातिवाचक शिवीगाळ केली, असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी इंद्रजित सावजी, विनय सावजी यांच्यासह १२ जणांविरुद्ध विविध कलमान्वये तसेच अनुसूचित जाती- जमाती प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.