शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्धीचा हव्यास सानंदांनाच!

By admin | Updated: July 15, 2017 00:39 IST

भाजप शहराध्यक्ष संजय शिनगारे यांचा पलटवार

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गल्ली ते दिल्ली सत्तेतून बेदखल होऊनसुद्धा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची फुकटचे श्रेय लाटण्याची जुनी सवय अद्यापही गेलेली नाही. विधान सभा, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये खामगाव विधान सभा मतदारसंघातील सुज्ञ जनतेने काँग्रेस पक्षाला व सानंदांना सपशेल घरी बसविले. मात्र, पराभवाचे आत्मचिंतन करण्याऐवजी दिशाभूल करण्यातच ते धन्यता मानत असल्याचा पलटवार भाजप शहर अध्यक्ष संजय शिनगारे यांनी केला आहे.ना. भाऊसाहेब फुंडकर व आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी फुकटचेच काय, तर स्वत: केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचे श्रेयाचे राजकारण कधीही केले नसून, सानंदांनी वर्तमानपत्रांना प्रसिद्धी पत्रक पाठवून नामदार भाऊसाहेब फुंडकर व आ.अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे, तथ्यहीन व जनतेची दिशाभूल करणारे आहेत. सामान्य रुग्णालयातील ज्या काँग्रेस शासनाच्या काळातील कामांचा उल्लेख सानंदांनी केला, तेव्हा फक्त ती कामे प्रस्तावित झालेली होती; परंतु सानंदांनी डायलिसीससाठी अंदाजपत्रकातील संपूर्ण कामे मंजूर होण्यासाठी एक कोटी रुपयांची आवश्यकता असताना केवळ ३३ लाख रुपये एवढाच निधी मिळाल्याने भिंती व स्लॅब टाकणे एवढेच काम झाले. तर उर्वरित निधी खेचून आणण्याकरिता कोणतेही प्रयत्न केले नाही. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर हे निवडून आल्यानंतर त्यांनी सामान्य रुग्णालय येथे घेतलेल्या आढावा बैठकीत डायलिसीस युनिटचे काम निधीअभावी रखडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आमदार फुंडकरांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व रुग्णालय प्रशासनाला सूचना देऊन डायलिसीस युनिटच्या उर्वरित कामाच्या निधीसाठी सुधारित प्रस्ताव शासनास सादर करण्यास सांगितले. त्यानंतर त्याचा पाठपुरावा करीत २० मे २०१७ रोजी आयुक्त आरोग्य सेवा संचालनालयाद्वारे त्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच सोनोग्राफी मशीन्स सुरू करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून घेतली. कालपर्यंत जवळपास ४३७० रुग्णांनी सोनोग्राफीचा लाभ घेतला आहे. आ. आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नांनी पाच नवीन व्हेंटीलेटर बसविण्यात आले. एन.आर.एच.एम. च्या माध्यमातून भुल तज्ज्ञ व शल्यचिकित्सक ही रिक्त पदे मान्यता मिळवून प्राप्त करून घेतली असून, या पदांवर लवकरच संबंधित डॉक्टर रुजू होणार आहेत. शवविच्छेदन गृह, रुग्णाच्या नातेवाईकांसाठी निवारा बांधकाम, अंतर्गत रस्ते डांबरीकरण, अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थाने बांधकाम करणे, यासह कोट्यवधी रुपयांची विविध कामे शासनदरबारी प्रस्तावित असून, लवकरच त्याला मान्यता मिळून कामे सुरू होणार आहेत, असेही संजय शिनगारे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. ‘सामान्य रुग्णालया’चा दर्जा भाऊसाहेबांमुळेच!खामगाव परिसरात झालेली धरणे असो किंवा एमआयडीसी भाऊसाहेबांच्या काळातीलच. एवढेच काय, तर रुग्णालयाला मिळालेला ‘साामान्य रुग्णालय’हा दर्जादेखील भाऊसाहेब जेव्हा पहिल्यांदा १९७८ मध्ये आमदार झाले, तेव्हा त्यांच्या पाठपुराव्यामुळेच मिळालेला आहे. त्यामुळेच खामगावच्या सामान्य रुग्णालयात रुग्णसेवेचा दर्जा सुधारला आहे व त्याचा फायदा जनतेला आजही होत आहे, हे सानंदा विसरलेले दिसतात, हे उल्लेखनीय.