शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे अर्ज भरणे अशक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:06 IST

सुहास वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’ अंतर्गत कर्जमाफीसाठी ग्रा.पं. अंतर्गत असलेल्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून अर्ज सादर करण्याचे आदेश शासनाने दिले; मात्र प्रत्यक्षात ग्रा.पं. मधील सेवा केंद्रामध्ये नेट कनेक्टिव्हिटी नाही. तर काही केंद्रात केंद्र चालक नाहीत. अशा विविध समस्यांमुळे बहुतांश ग्रा.पं. मधून ...

ठळक मुद्देग्रामीण भागात ‘नेट कनेक्टिव्हिटी’ची समस्या

सुहास वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’ अंतर्गत कर्जमाफीसाठी ग्रा.पं. अंतर्गत असलेल्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून अर्ज सादर करण्याचे आदेश शासनाने दिले; मात्र प्रत्यक्षात ग्रा.पं. मधील सेवा केंद्रामध्ये नेट कनेक्टिव्हिटी नाही. तर काही केंद्रात केंद्र चालक नाहीत. अशा विविध समस्यांमुळे बहुतांश ग्रा.पं. मधून कर्जमाफीचे अर्र्ज भरणे अशक्य झाले आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीच्या लाभासाठी ग्रा.पं. स्तरावून चालविण्यात येणाºया आपले सरकार सेवा केंद्रातून अर्ज पाठविण्याचे आदेश देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात ग्रामपंचायतींना २०१३ मध्ये सुमारे ४ वर्षांपूर्वी संगणक मिळाले आहेत. त्याकरिता संगणक परिचालकांची नियुक्ती झाली आहे; मात्र प्रत्यक्षात आज रोजी अनेक ग्रा.पं.मध्ये ते संगणक व प्रिंटर धूळ खात पडून आहेत. काही ग्रा.पं.मध्ये ते सुरू आहेत. तर सध्याच्या सॉफ्टवेअरच्या तुलनेत ते कालबाह्य झाले आहेत. ग्रा.पं.मध्ये ब्रॉडबॅन्ड नाही.काही ग्रा.पं.चा आॅनलाइन कारभार ग्रा.पं.च्या मिळणाºया ‘टू’ जी सेवेवर कसाबसा सुरू आहे. आजही जिल्ह्यातील काही ग्रा.पं.मध्ये आपले सरकार केंद्र संचालकांची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे या केंद्रातून कर्जमाफीचा अर्ज भरणे अशक्य झाले आहे. तर जिल्ह्यातील बहुतांश आपले सरकार केंद्र अद्याप सुरूच झालेले नाहीत. त्यामुळे ग्रा.पं. स्तरावरून सदर कर्जमाफीचे अर्ज पाठविणे अशक्य झाले आहे.‘शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामसेवक व केंद्रचालक सदर अर्ज भरण्यासाठी पुढाकार घेऊन कार्यरत आहेत; मात्र नेट कनेक्टिव्हिटी नसल्याने तसेच प्रिंटर नादुरुस्त झाल्याने या केंद्राच्या माध्यमातून सदर काम करणे अशक्य झाले आहे.- प्रशांत जामोदराज्य सरचिटणीस, ग्रामसेवक युनियन