शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुदतबाह्य खाद्य पदार्थांची विक्री!

By admin | Updated: April 28, 2017 00:47 IST

खामगाव : शहर व परिसरात मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री सर्रास सुरुअसून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. लोकमतने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये सदर प्रकार उघड झाला.

नागरिकांच्या आरोग्याशी सुरु आहे खेळखामगाव : शहर व परिसरात मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री सर्रास सुरुअसून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. लोकमतने गुरुवार २७ एप्रिल रोजी केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये सदर प्रकार उघड झाला. सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये खाण्यापिण्याचे विविध पदार्थ स्वत: च्या घरी तयार करुन घ्यायला बहुतांश नागरिकांकडे वेळ नाही. महिला सुध्दा नोकरी करु लागल्याने अनेक पदार्थ हे घरी तयार करण्याऐवजी रेडीमेड विकत घेण्याकडे कल वाढलेला आहे. यात लहान मुलांच्या खाऊपासून गव्हाच्या पिठापर्यंत अनेक पदार्थ रेडीमेड व पाकिटबंद स्वरुपात विकत घेतले जातात. नागरिकांची गरज लक्षात घेता पापड, लोणचे, चटणी यासह चिवडा, शेव, पापडी, गाठीया, आलू चिप्स, असे कितीतरी खाद्यपदार्थ आज बाजारात पाकिटबंद स्वरुपात विकायला आलेले आहेत. तसेच विविध शितपेय, लहान मुलांकरिता विविध प्रकारचे चॉकलेट्स व चटकदार पदार्थ सुध्दा जागोजागी दिसतात. या खाद्यपदार्थांची मुदत निघून गेल्यावरही संबंधित विक्रेते आपले स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी ते ग्राहकांना विकून मोकळे होतात. याबाबत लोकमतच्या चमूने गुरुवारी शहरातील विविध भागात जावून काही खाद्यपदार्थांची खरेदी केली असता या प्रकारात बरेच तथ्य आढळून आले. मुदतबाह्य पदार्थांची विक्री केल्यानंतर सदर बाब लक्षात आणून दिली असता काहींनी पाकिटे बदलून दिली तर काहींनी तारीख निघून गेली तरी काही फरक पडत नाही असे म्हणून चक्क त्यास नकार दिला. असे झाले स्टिंग आॅपरेशन गुरुवार २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता स्टिंग आॅपरेशन करण्यासाठी लोकमतची चमू गठीत करण्यात आली. यामध्ये संपादकीय विभागातील सहकाऱ्यांसह वार्ताहर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे मिळून तीन पथक तयार करण्यात आले. या पथकांनी मेनरोडवरील काही दुकाने, बसस्थानक परिसर, नांदुरा रोड आदी भागात जावून खाद्य पदार्थांची पाहणी व प्रत्यक्ष खरेदी करुन मुदतबाह्य पदार्थ विक्री होत असल्याची खात्री केली. काही हॉटेलांमध्ये सुध्दा कित्येक दिवसाच्या शिळ्या पदार्थांची विक्री केली जात असल्याचे दिसून आले.कमवत्या महिलांचा खरेदीकडे कलमुलांकरिता घरीच काहीतरी पौष्टीक पदार्थ तयार करुन खाऊ घालायला कमवत्या महिलांकडे वेळ नाही. त्यामुळे अशी खरेदी करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. परंतु असे खाद्यपदार्थ जास्त काळ सुस्थितीत राहत नाहीत. त्यांची मुदत ( एक्सपायरी डेट) फार कमी असते. बरेचदा ती निघून गेल्यावरही उत्पादक आणि दुकानदार आपले नुकसान टाळण्यासाठी ग्राहकांना विकून मोकळे होतात. यात मुदतीकडे लक्ष न देणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्यावर त्याचा नकळत विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तयार खाद्यपदार्थांची खरेदी करताना ग्राहकांनी जागरुक राहण्याची गरज आहे.