शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना संसर्ग ओसरल्यानंतरही ८२ टक्के शाळा बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST

बुलडाणा : ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा सुरू असून, शहरात मात्र संस्थाचालकांना अद्यापही शाळा सुरू करण्याच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ...

बुलडाणा : ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा सुरू असून, शहरात मात्र संस्थाचालकांना अद्यापही शाळा सुरू करण्याच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग ओसरल्यानंतरही ८२ टक्के शाळा बंदच आहेत. कोरोना रुग्ण नसलेल्या शहरात ऑफलाईन शिक्षण केव्हा सुरू होणार, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे.

कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये आठवीनंतरचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भावदेखील कमी झाला आहे, तरीही जिल्ह्यातील शहरातील शाळांमध्ये अजूनही ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देण्याबाबत राज्य शासनाच्या आदेश आणि शिक्षण विभागाच्या सूचना नसल्याने शाळांची अडचण झाली आहे. त्यांना आदेशाची प्रतीक्षा लागली आहे. कोरोना कमी झाला असल्याने प्रत्यक्षात वर्ग भरविण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले

दीड वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणात मुलांना एकाच खोलीत मोबाईलसमोर दिवसभर बसून ठेवण्यात येत आहे. शहरी भागातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाला कंटाळले असून त्यांना ऑफलाईन शिक्षणाची प्रतीक्षा आहे.

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

ज्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, तेथील पालकांची संमती अथवा हमीपत्रे घेऊन आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची सूचना शाळांना केली. त्यानुसार गेल्या अडीच महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमधील वर्ग सुरू झाले. टप्प्या-टप्प्याने वर्ग सुरू करणाऱ्या शाळांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातील शाळांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

आतापर्यंत ४८३ शाळांची घंटा वाजली

गेल्या अडीच महिन्यांत जिल्ह्यातील ४८३ माध्यमिक शाळांची घंटा वाजली आहे. या शाळांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग कोरोना नियमांचे पालन करत भरले आहेत. सुरू झालेल्या माध्यमिक शाळा ह्या ग्रामीण भागातीलच आहेत. या शाळांनी दोन्ही पद्धतीने शिक्षण सुरू ठेवले आहे.

शहरातील शाळांबाबत आदेश नाही

ग्रामीण भागातील ४८३ शाळा सुरू आहेत. शहरातील शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कुठलाच आदेश नाही. त्यामुळे सध्या शहरात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.

सचिन जगताप, प्राथमिक, शिक्षणाधिकारी बुलडाणा.

जिल्ह्यातील एकूण शाळा : २७००

सुरू झालेल्या शाळा : ४८३

जिल्हा परिषद शाळा : १४८३

नगरपालिका शाळा : १०५

अनुदानित : ५१५